महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या सोमवारी महावितरण घेणार ग्राहक मेळावा

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हयामध्ये महावितरणचे सहा विभागीय कार्यालय असून एकूण वीज ग्राहक संख्या 12.58 लाख इतकी आहे. कोल्हापूर जिल्हयामध्ये महावितरणद्वारे घरगुती, औद्योगिक, व्यापारी, शेतीपंप व इतर ग्राहकांना विजपुरवठा देऊन जिल्हयाच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान दिले जाते. महावितरणमध्ये सद्या ग्राहकांना देणेत येणाऱ्या योजनांमध्ये ग्राहकांना नवीन विद्युत पुरवठा देणे, ग्राहकांचा वीज भार वाढवणे अथवा कमी करणे, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत ग्राहकांना छतावरील सौरऊर्जा पॅनेलद्वारे विजपुरवठा करणे, शेतकऱ्यांना दिवसा विजपुरवठा देणेकरीता कुसुम बी व मागेल त्याला सौरपंप देणे इत्यादी योजनांचा समावेश आहे.

महावितरणमध्ये कॅरम खेळले…हरियाणा ऍथलेटिक्समध्ये!

महावितरणतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध सेवा व सुविधांच्या अनुषंगाने ग्राहकांच्या तक्रारी असल्यास त्या तक्रारीचे निरसन वेळेत होणे व जलद गतीने निपटारा होणे आवश्यक आहे. या उद्देशाने महावितरण महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या सोमवारी सकाळी 10:00 ते दुपरी 01:30 पर्यंत विभागीय तसेच उपविभागीय स्तरावर ग्राहक मेळावा घेणार आहे. तसेच सोमवारी शासकीय सुट्टी असेल तर पुढील दिवशी म्हणजेच मंगळवारी सदरचा ग्राहक मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. ग्राहकांनी सदरच्या ग्राहक मेळाव्यामध्ये सहभागी होऊन आपले तक्रार अर्ज सादर करणेबाबत आव्हान महावितरणद्वारे करण्यात येत आहे.

महावितरण कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने ‘चिक्केवाडी’ पुन्हा उजळली

सदर ग्राहक मेळाव्यामध्ये प्राप्त होणाऱ्या तक्रार अर्जाबाबत तातडीने निपटारा करण्यावर भर दिला जाणार आहे असे कोल्हापूर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी म्हंटले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.