आरोग्यसेवेचा निस्वार्थी दीपस्तंभ म्हणजे – महाराष्ट्राचे आरोग्यदूत मंगेश चिवटे

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

आरोग्यदूत मंगेश चिवटे यांचा आज वाढदिवस…

(शब्दांकन – विनायक जितकर) – आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, हे ज्या व्यक्तीने केवळ समजून घेतले नाही, तर ते आपल्या कार्याने समाजासमोर सतत दाखवून दिले, अशा व्यक्तीमत्वाचे नाव म्हणजे मा. मंगेश चिवटे साहेब — महाराष्ट्राचे खरे ‘आरोग्यदूत’ मा. चिवटे साहेब हे सध्या उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख म्हणून कार्यरत असून, राज्यभरातील गरजू रुग्णांना तातडीने आणि योग्य वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत.

मंगेश चिवटे यांची कार्यशैली म्हणजे संवेदनशीलतेचे जिवंत उदाहरण आहे. मदतीची गरज असलेला कुठलाही नागरिक असो, त्याच्यापर्यंत मदतीचा हात पोहोचवण्यासाठी साहेब सतत तत्पर असतात. कोणतीही प्रसिद्धी न करता, केवळ कर्तव्यभावनेने काम करणाऱ्या या सेवाव्रती व्यक्तीमत्त्वामुळे आज लाखो कुटुंबांच्या डोळ्यांत आशेचा किरण आहे. कोणीही वैद्यकीय मदतीसाठी धडपडत असताना, चिवटे साहेबांचे नाव एक आधार बनून समोर येते. त्यांच्या संवेदनशील व तात्काळ निर्णयक्षमतेमुळे असंख्य रुग्णांना नवजीवन मिळाले आहे.

आज त्यांचा वाढदिवस… पण नेहमीप्रमाणे ते कोणतेही सोहळे न करता आपले संपूर्ण लक्ष गरजूंना मदत करण्यात गुंतवून ठेवतात. त्यांचे आयुष्य म्हणजेच समाजासाठी वाहून घेतलेले एक व्रत आहे. त्यांच्या या समर्पित सेवेसोबत, साधेपणा, नम्रता आणि माणुसकीची ज्योतही दिसून येते. म्हणूनच ते केवळ एका पदावर असलेले अधिकारी नाहीत, तर सर्वसामान्य जनतेच्या हृदयात स्थान मिळवलेले आरोग्यसेवेचे दूत आहेत.

आपल्या कार्यास अष्टपैलू यश लाभो, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजसेवेस नवे आयाम लाभोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

विनायक जितकर (पत्रकार)
POSITIVE WATCH MEDIA
कोल्हापूर – 8082219280

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.