Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.लाडक्या बहिणीसाठी एकनाथ शिंदेंची धाव
किडनीच्या आजाराने ग्रस्त महिलेला दिला धीर
स्वतःच्या चार्टर्ड विमानाने आणले मुंबईतमुंबई : किडनी प्रत्यारोपणासाठी मुंबईत येणाऱ्या महिलेला विमानतळावर पोहोचण्यास उशीर झाला अन् विमानाने टेक ऑफ केले. आता मुंबईत वेळीच पोहोचणे शक्य नाही आणि किडनी प्रत्यारोपण होईल की नाही याची चिंता महिलाला सतावत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानी महिलेची गोष्ट आली. एकनाथ शिंदे यांनी क्षणाचाही विचार न करता स्वतःच्या चार्टर्ड विमानाने महिलेला मुंबईत आणले. विशेष म्हणजे मुंबईत रुग्ण वाहिका उपलब्ध करून देत रुग्णालयात दाखल करेपर्यंत शिंदे यांनी महिलेला सर्वोतोपरी मदत केली. संकटसमयी दुसऱ्याच्या मदतीसाठी धाव घेणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काॅमन मॅन म्हणून पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी मुक्ताई नगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आले होते.जळगाव जिल्ह्यातील शीतल पाटील या किडनी विकाराने त्रस्त होत्या. किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यासाठीच त्या विमानाने मुंबईकडे निघाल्या होत्या. किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी शीतल याना तात्काळ मुंबईत पोहोचायचे होते. मात्र त्या विमानतळावर पोहोचण्याअधीच मुंबईकडे जाणारे विमान निघून गेल्याचे त्यांना समजले. मुंबईत वेळेत पोहोचणे त्यांच्यासाठी निव्वळ अशक्य होऊन बसले. आता आपली किडणी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया होऊ शकेल की, नाही ही एकच चिंता त्यांना सतावू लागली. मात्र त्याचवेळी त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चार्टर्ड विमान जळगाव विमानतळावरुन मुंबईकडे जाणार असल्याचे समजले.
आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...पाटील यांनी आपली अडचण विमानतळावर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्या कानावर घातली. कार्यकर्त्यांनी ही बाब मंत्री गिरीश महाजन यांच्या कानावर घातली. महाजन यांनी शीतल पाटील आणि त्यांच्या पतीला आपल्या विमानातून मुंबईला घेऊन जाण्याची विनंती उपमुख्यमंत्री शिंदे यांना मंत्री गिरीश महाजन यांनी केली. क्षणाचाही विलंब न लावता शिंदे यांनी त्यासाठी होकार दिला. वेळ पडल्यास माझे दोन अधिकारी जळगाव मध्ये थांबतील पण माझ्या लाडक्या बहिणीला मी मुंबईला सोबत घेऊन जाणारच असे त्यांनी महाजन यांना सांगितले.
यानंतर महिला आणि तिच्या पतीला आपल्या चार्टर्ड विमानातून उपमुख्यमंत्री शिंदे मुंबईत घेऊन आले. प्रवासादरम्यान त्यांनी या महिलेशी बोलून त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच मुंबईत आल्यावर त्यांच्यासाठी विशेष रुग्णवाहिका उपलब्ध करून देत या महिलेला रुग्णालयातही दाखल केले.
उपमुख्यमंत्री शिंदे हे कायमच गरजूंच्या मदतीला धावून जातात हे सर्वश्रुत आहे. त्यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय अनेकदा लोकांना आला आहे. मात्र विमान चुकलेल्या लाडक्या बहिणीच्या मदतीला धावून जात ते आजही ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ आहेत हेच त्यांच्या या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याचे मत या घटनेनंतर जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले आहे.
घडल… असं, झाली बातमी…उपमुख्यमंत्री शिंदेनी दिला विमानात धीर…
पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.











































































