स्वतःच्याच व्यवसायात गेला हकनाक बळी! केबल ऑपरेटर अतुल कदम याचा मृत्यू मनाला चटका देणारा

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

स्वतःच्याच व्यवसायात गेला हकनाक बळी

केबल ऑपरेटर अतुल कदम याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू – यंत्रणा झोपलेलीच का?

शिरोली: “आपल्या कामाचे काही घडोघडीच शहीद होतो,” ही वाक्यं आज अतुल तानाजी कदम (वय ३२) यांच्या बाबतीत अक्षरशः खरी ठरली. नागाव येथील केबल ऑपरेटर अतुल यांच्या मृत्यूमुळे एक तरुण, स्वावलंबी जीवनपद्धती जगणारा तरुण, स्वतःच्या व्यवसायातच अडकून गेला आणि जिवाला मुकला.

ही घटना सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. त्याच्या केबल व्यवसायाशी संबंधित एका घरातून केबल काढण्याचे काम सुरु असताना, २१ केव्ही उच्चदाब वीज वाहक तारेला हात लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही  घटना त्याच्याच गावी घडली.
तो एकटा, कोणतीही सुरक्षा साधने न घेता काम करत होता – हेही विशेष.

मरण नेमकं कोणाच्या हलगर्जीपणामुळे?

कोल्हापूर येथील एका चॅनेलची केबल एजन्सी चालवणाऱ्या अतुलने गावातील अनेक घरांना केबल कनेक्शन दिले होते. संबंधित घराचे बांधकाम सुरू असल्याने एका मालकाने केबल काढून टाकण्यास सांगितले होते. यासाठी एक कंपनी ऑपरेटरही उपस्थित होता. मात्र अतुलच स्वतःच काम करत होता. पण याच कामातून आपला जीव जाणार याची पुसटशी कल्पनाही त्या अतुल ला नव्हती.

ज्या ठिकाणी उच्चदाब विद्युत तारेचे अस्तित्व आहे, तिथे काम करताना कोणतीही सावधगिरी, इन्शुरन्स, सुरक्षा गिअर, मोजणी यंत्रणा, वॉर्निंग यंत्रणा यापैकी काहीही नव्हते. ही चूक केवळ अतुलची नव्हे – तर संपूर्ण व्यवस्थेची आहे.

यंत्रणा फक्त अपघातानंतर का जागते?

स्वतःच्या व्यवसायात असंख्य युवक आज उभे राहतात – प्लंबिंग, केबल, इलेक्ट्रिक, बांधकाम, कुरिअर, ऑन ड्युटी डिलिव्हरी – पण त्यांच्यासाठी कोणती सुरक्षा गाइडलाइन आहेत? याचा आता अभ्यास होणे गरजेचे आहे. याकडे प्रशासकीय यंत्रणा लक्ष देणार आहे की नाही. 

स्थानिक प्रशासनाकडे याचे नोंदवही आहे का?

अशी कामे करणाऱ्यांना प्रशिक्षित करणे, सुरक्षा साधने देणे याची जवाबदारी कोणाची?

अपघातानंतर विमा, नुकसान भरपाई, कुटुंबाच्या सहाय्याची काय तरतूद आहे?

या प्रश्नांना उत्तर नाही, आणि म्हणूनच अतुलसारख्या तरुणांचा मृत्यू केवळ एक बातमी ठरतो, धडा बनत नाही.

एक हकनाक मृत्यू… आणि किती?

अतुलवर कुटुंबाची जबाबदारी होती. या घटनेमुळे. एका घराचा दिवा अचानक विझला.आज समाजाला, प्रशासनाला, आणि व्यावसायिक यंत्रणेला एक विचार करण्याची गरज आहे –
स्वावलंबनाच्या प्रवासात शहीद होणाऱ्यांची जबाबदारी कोण घेणार? यावर प्रशासन कोणती भूमिका घेणार, विमा कंपनी काही मदत करणार का याकडे लक्ष आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.