औद्योगिक सहकारी संस्थांना दिलासा…

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

प्रा. शहाजी कांबळे यांच्या पाठपुराव्याला यश : राज्यातील 509 मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांना दिलासा

मुंबई : मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी प्रा. शहाजी कांबळे (अध्यक्ष, मागासवर्गीय संस्था महासंघ) यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. त्यांच्या मागणीवरून राज्यातील 509 संस्थांना दिलासा मिळणार आहे.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांना महासंघाच्या वतीने अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, उपाध्यक्ष प्रमोद कदम, रवी रजपूत, कुमार कांबळे आणि प्रमोद बेलेकर यांनी औद्योगिक संस्थांच्या अडचणींबाबत निवेदन दिले होते. त्यानुसार पालकमंत्री आबिटकर यांनी सामाजिक न्याय मंत्री ना. संजय शिरसाट यांना यासंदर्भात पत्र पाठवले आणि बैठकीचे आयोजन करण्याची विनंती केली.

या पार्श्वभूमीवर मंत्रालयात ना. संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत प्रा. शहाजी कांबळे यांनी संस्थेच्या ५% स्व-भागभांडवलास शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याची ठाम भूमिका मांडली. या मागणीला तत्काळ मंजुरी देण्यात आली असून, हा निधी संस्थांच्या कामकाजासाठी वापरण्यात येणार आहे.

तसेच, बँकेच्या ऐवजी २५% कर्ज व भागभांडवल थेट शासनाने द्यावे, ही मागणीही ना. शिरसाट यांनी मान्य करत ती राज्य मंत्रिमंडळासमोर मांडून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. याशिवाय, इतर प्रस्तावांबाबतही वेळेत निर्णय व्हावा, यासाठी आयुक्त व मंत्रालयातील प्रक्रियेला ठराविक वेळमर्यादा देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

शिरसाट यांनी ही योजना मागासवर्गीय उद्योजकांसाठी प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच, या योजनेंतर्गत मंजूर निधी इतरत्र वळवला जाऊ नये, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली. त्यांच्या या भूमिकेचे महासंघातर्फे अभिनंदन करण्यात आले.

या बैठकीस पालकमंत्री  प्रकाश आबिटकर, आमदार राहुल आवाडे, आमदार सत्यजित देशमुख, सामाजिक न्याय विभागाचे सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, आयुक्त डॉ. ओमप्रकाश बकोरिया, उपायुक्त सुरेंद्र पवार, रवी माने, प्रमोद कदम (शिवसेना जिल्हाप्रमुख), कुमार कांबळे, प्रमोद बेलेकर (रिपाई), संतोष भिगारे, शैलेंद्र ढेपे, अशोक भातपुटे, राजू सावंत व राज्यातील विविध संस्थांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते.

बैठक अत्यंत सकारात्मक ठरल्याने सर्व संस्थांचे पदाधिकारी नव्या उर्जेने प्रेरित झाले आहेत. सर्वांचे आभार महासंघाचे पदाधिकारी रवी रजपूत यांनी मानले.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.