
सद्गुरु शंकर महाराज भक्तांचा रविवार दि. २७ एप्रिल रोजी स्नेहमेळावा
दिवसभर मांदियाळी : पुण्यानजीक उरळी कांचन येथे विविध कार्यक्रम
पुणे : दरवर्षाप्रमाणे यावर्षीही संतवर्य योगीराज सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या भक्तांचा स्नेहमेळावा पुण्यानजीक हवेली तालुक्यातील उरळी कांचन येथे रविवार, दि.२७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. पुणे येथील ओम जय शंकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प.पू. सद्गुरु सु.द. उर्फ पप्पाजी पुराणिक महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ६.३० ते रात्री ९.३० वाजेपर्यंत भरगच्च कार्यक्रम होणार असल्याने दिवसभर भक्तांची मांदियाळी येथे बघावयास मिळणार आहे.
पुणे-सोलापूर रोडवरील कोरेगाव मूळ (उरळी कांचन) येथील यशोदा मंगल कार्यालयात सकाळी ६.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि ध्वजारोहणाने सोहळ्यास प्रारंभ होईल. त्यानंतर दत्तयाग,अभिषेक, शंकर गीता ग्रंथाचे सामुदायिक पारायण आणि शंकर गीता इंग्रजी ग्रंथाचे प्रकाशन होईल. विदेशातील भक्तांनाही पारायण करता यावे म्हणून खास इंग्रजीतून शंकर गीता ग्रंथ तयार केला असल्याचे प.पू. पुराणिक महाराजांनी सांगितले. सायंकाळी चार वाजता या इंग्रजी आवृत्तीचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन होईल.
*पुरस्कार वितरण*
यावेळी सौ. माई पुराणिक यांंच्या स्मरणार्थ माई अभ्यंकर पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी सुरसे (संस्थापक अध्यक्षा, स्वाभिमानी महिला संघटना) यांना विद्यावाचस्पती प्रा. डाॅ. राधिका गुप्ते (डी.लिट अमेरिका युनिव्हर्सिटी) यांचे हस्ते प्रदान केला जाणार आहे.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.सद्गुरु राजाभाऊ कोठारी यांचे प्रवचन
सद्गुरु विश्वेश्वर महाराज तथा राजाभाऊ कोठारी यांचे दुपारी दोन ते चार या वेळेत प्रवचन होईल. शिवाय मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. तरी श्री शंकर महाराज भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सद्गुरु सु.द. उर्फ पप्पाजी पुराणिक महाराज यांनी केले आहे.












































































