अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या स्पर्धांचे थाटात उदघाटन
“शरीर-मन सशक्त करणाऱ्या क्रीडा संस्कृतीचा उत्सव”
देशभरातून एक हजार खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग
कोल्हापूर POSITIVE WATCH TEAM:
शिस्त, सहकार्य आणि स्पर्धात्मकतेच्या भावनेने भारलेले वातावरण… अशा ऊर्जेने भारलेल्या क्षणात अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या ४६व्या क्रीडास्पर्धांना आज शिवाजी विद्यापीठात भव्य प्रारंभ झाला.
महापारेषणच्या कराड परिमंडलाच्या मुख्य अभियंता व क्रीडा स्पर्धा आयोजन समितीच्या अध्यक्षा शिल्पा कुंभार यांच्या हस्ते रोप जलार्पण करून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी कोण कोण मान्यवर उपस्थित आहेत बघा.
भुजंग खंदारे – कार्यकारी संचालक (नियोजन), महावितरण
डॉ. नितीन वाघ – कार्यकारी संचालक (मानव संसाधन), महानिर्मिती
परेश भागवत – प्रादेशिक संचालक, महावितरण
स्वप्नील काटकर – मुख्य अभियंता, महावितरण
संजय चोपडे – मुख्य अभियंता, महानिर्मिती
भरत पाटील – मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी व उपाध्यक्ष, महापारेषण
संजय ढोके, पुरुषोत्तम वारजूरकर, ललित गायकवाड, प्रांजल कांबळे, आनंद कोंत, सुरेंदर शेवकंद, शिरीष काटकर, प्रसाद निकम – विविध पदाधिकारी व अधिकाररी उपस्थित होते.
या स्पर्धा १७ ते १९ एप्रिल २०२५ या कालावधीत कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात अॅथलेटिक्स, कॅरम व्हॉलीबॉल यासारखे क्रीडा प्रकार पार पडत आहेत.

***महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या क्रीडामहोत्सवात देशभरातून सुमारे एक हजार महिला व पुरुष खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. ***
क्षणचित्र:
सकाळी १० वाजता भव्य संचलन व पाहुण्यांना मानवंदना
क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन आणि ध्वजारोहण
शिवकालीन मर्दानी खेळ आणि मल्लखांबचे प्रात्यक्षिक
चषकाचे अनावरण आणि महाराष्ट्र गीत सादरीकरण
प्रेरणादायी विचार:
> “स्पर्धा म्हणजे फक्त विजय नव्हे, तर शरीर आणि मनाचा विकास करणारी एक सुंदर प्रक्रिया आहे,”
शिल्पा कुंभार, अध्यक्षा, क्रीडा आयोजन समिती
आपल्या अध्यक्षीय भाषणात कुंभार यांनी खेळाडूंना प्रेरणा देत सांगितले की,
> “खेळाडूंनी स्पर्धेचा आनंद घेताना खिलाडूपणा आणि सुदृढतेचा वारसा जपावा. हा उत्सव केवळ स्पर्धेपुरता मर्यादित नसून जीवनशैलीचा भाग असावा.”
–
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समारोप यांनी आपल्या सुमधुर आवाजात केले. उपस्थितांना खिळवून ठेवले
प्रास्ताविक : ललित गायकवाड व प्रांजल कांबळे
सूत्रसंचालन : महेंद्र कुलकर्णी व सुरेश पाटील
आभार प्रदर्शन : पुरुषोत्तम वारजूरकरण
समारोप : राष्ट्रगीताच्या सादरीकरणाने
स्पर्धेचे हे मंच खेळाडूंना नवसंजीवनी देत, ऊर्जा, एकात्मता व आरोग्याचा संदेश घेऊन पुढील तीन दिवस क्रीडा उत्सवात रंगत आणणार आहेत.
—
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.












































































