महिलांनी गृहउपयोगी व्यवसाय उभा करून स्वावलंबी बनणे हि काळाची गरज – अरुण डोंगळे

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

जागतिक महिला दिनानिमित्त कुंभोज येथे गोकुळ शॉपी चे उद्‌घाटन संपन्न

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या कुंभोज ता. हातकणंगले येथे नवीन गोकुळ शॉपीचे उद्‌घाटन गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्‍ते व संचालक डॉ. सुजित मिणचेकर तसेच संघाचे अधिकारी व मान्यवर यांच्या उपस्थित करण्यात आले.

यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, महिलांनी विविध गृहउपयोगी व्यवसाय उभा करून स्वत: स्वावलंबी बनणे हि काळाची गरज असून आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कुंभोज गावच्या कुमारी पूजा पोवार या उच्चशिक्षित तरुणीने व्यवसाय म्हणून ‘मातोश्री गोकुळ दुग्धालय’ उभे केले असून हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन श्री डोंगळे यांनी केले. या शॉपीमध्ये दूध, श्रीखंड, आंबा श्रीखंड, तूप, पनीर, बटर, दही, ताक, लस्सी, दूध पावडर, बासुंदी, फ्लेवर्ड मिल्क व्हॅनिला, पिस्ता, चॉकलेट व स्ट्रॉबेरी तसेच टेट्रा पॅकिंगमध्ये व्हॅनिला व मँगो लस्सी, मसाला ताक इत्यादी दूग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध ठेवले जाणार असून या दुग्धालयामुळे कुंभोज परिसरातील नागरिकांना गोकुळची विविध दर्जेदार उत्पादने उपलब्ध होणार आहेत असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी प्रमुख उपस्थिती गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक डॉ.सुजित मिणचेकर, मातोश्री गोकुळ दुग्धालय प्रोप्रायटर पूजा पोवार, मार्केटिंग विभागाचे हणमंत पाटील, लक्ष्मण धनवडे, प्रतिक मुळीक तसेच गावातील महिला आदी उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.