घरासाठी स्टील देतो सांगून कागल मध्ये ९ लाख ७६ हजाराची फसवणूक

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

कागल पोलिसात गुन्हा दाखल; टाटा कंपनीचा मॅनेजर असल्याची बतावणी

कोल्हापूर – घर बांधण्यासाठी बाजारभावापेक्षा स्वस्त दराने टाटा स्टील मिळते म्हणून आरटीजीएस केलेले नऊ लाख 76 हजार 960 रुपये पाठवूनही स्टील मिळालेले नसल्याने कागल येथील रमेश गणपती पन्हाळकर यांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत गोविंद मारुती बिरजे राहणार एकता नगर यांनी कागल पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

रमेश पन्हाळकर हे कागल येथील अनंत रोटो नगर मध्ये घर बांधत आहेत. त्यांना टाटा स्टीलची आवश्यकता असल्याने त्यांनी गुगलवर जाऊन टाटा स्टील ची माहिती सर्च करून घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला.संशयित आरोपी रंजय कुमार यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. त्यांनी मी टाटा स्टील कंपनीचा जनरल मॅनेजर असल्याचे सांगितले व विपिन गुप्ता हे मुंबई विभागाचे सेल मॅनेजर आहेत. त्यांना संपर्क साधण्यास सांगितले. पन्हाळकर यांनी मोबाईल वरून विपिन गुप्ता यांच्याशी संपर्क साधला आणि घराच्या बांधकामासाठी आपल्या कंपनीकडून १६ टन ७०० किलो इतके स्टील लागणार असल्याचे सांगितले. त्यावेळी विपिन गुप्ता यांनी पन्हाळकर यांना मोबाईलवर व्हाट्सअप वर इन्व्हाईस पावती व दर पत्रक पाठवून दिले.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

बाजारभावापेक्षा स्वस्त दरात स्टील मिळत असल्याचे पाहून पन्हाळकर यांनी त्यांचे मेहुणे गोविंद बिरंजे यांच्याशी संपर्क साधला व विपिन गुप्ता यांच्याशी बोलायला सांगितले. त्यानुसार स्टील पाठवत असल्याचे सांगून गुप्ता यांनी बँक खाते क्रमांक दिले. त्या खात्यावर नऊ लाख ७६ हजार ९६० रुपये पाठवण्यास सांगितले. पन्हाळकर यांनी दिनांक ३० नोव्हेंबर रोजी कागल येथील बँक ऑफ बडोदा शाखेतून कर्नाटक बँक अंधेरी ईस्ट मुंबई तसेच दिनांक २ डिसेंबर ला कॅनरा बँक शाखा अंधेरी ईस्ट या ठिकाणी आरटीजीएस करून पैसे पाठवले. पैसे घेऊन देखील घराच्या बांधकामासाठी टाटा स्टीलचा पुरवठा केलेला नाही म्हणून फसवणुकीची तक्रार दाखल झाली.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.