विविध कार्यक्रमांनी रंगला;आंतरशालेय क्रीडा महोत्सव

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

आंतरशालेय क्रीडा महोत्सव २०२४ उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न..

कोल्हापूर: मुक्तसैनिक विद्यापीठांतर्गत शां.कृ.पंत वालावलकर हायस्कूल, कोल्हापूर येथे आंतरशालेय क्रीडा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला. प्रमुख उद्घाटक म्हणून वसंत पाटील (अधीक्षक, उपसंचालक कार्यालय संभाजीनगर कोल्हापूर),पुजा जोशी (अध्यक्षःअनंत फौंडेशन ), सामाजिक कार्यकर्ते मान. श्री महेश वारके, आंतरभारती शिक्षण मंडळाचे सचिव मान.एम.एस.पाटोळे , मुख्याध्यापिका वृषाली कुलकर्णी, उपमुख्याध्यापक आर.पी.मोरे , पर्यवेक्षक  एस.पी. पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.


क्रीडाशिक्षक राष्ट्रीय प्रशिक्षक राजेंद्र बनसोडे,क्रीडाशिक्षक देवीदास महाले, क्रीडाशिक्षिका इंद्रायणी पाटील शालेय क्रीडामंत्री श्रेयश शिंदे याने क्रीडा शपथ दिली.

राष्ट्रीय खेळाडू गिरीजा विभूते हीने क्रीडाज्योतीचे संचलन केले. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय MLB कॅम्प केलेले जय कुंभार ,सर्मथ जाधव, स्वराज यांचा तसेच राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.लाठी-काठी,कॅलेस्थेनिक्स व स्पोटर्स डान्स यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली.


मान्यवरांचे आभार इंद्रायणी पाटील यांनी मानले तर पल्लवी यादव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.