CRIME:कोल्हापुरात सापडलेले कोकेन कनेक्शन मुंबईत,एक जण ताब्यात

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

 

आमदार प्रकाश आबिटकरांचा कामाचा धडाका

कोल्हापुरात सापडलेले कोकेन कनेक्शन मुंबईत,एक जण ताब्यात

कोल्हापूर: येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण ने गुरूवारी जप्त केलेल्या कोकेन कारवाईचे कनेक्शन थेट मुंबई पर्यन्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कारवाई नंतर मुंबई येथे तपासकामी गेलेल्या पथकाने विशाल तांबडे ( रा. ग्रांट रोड, मुंबई) यास ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, उद्या सोमवार दि. 14 पर्यन्त पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

आजच लाभ घ्या, गुंतवणूक करा

आरोपी विशाल तांबडे, मुंबई

कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोठी कारवाई करताना कोकेन जप्त केले होते.पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी यामागे मोठे रॅकेट असून मुबंई पर्यन्त कनेक्शन असल्याचे सांगत, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असल्यास आहे. यातूनच मुंबई येथे तपास पथक दाखल झाले असता,महेश तांबडे याला ताब्यात घेण्यात आले आहे. कोल्हापूर येथे 133 ग्रॅम जप्त केलेल्या कोकेन कारवाईत या आधीच संशयित म्हणून निलेश जाधव याला ताब्यात घेण्यात आले आहे .

दोघांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, विशाल तांबडे ,(व्यवसाय शेअर मार्केट, सध्या राहणार ग्रँट रोड, मुबई मूळ राहणार रायगड कॉलनी, पाचगाव कोल्हापूर) याने दिला असलेचे तपासात निष्पन्न झाले आहे. मुंबई येथील मोहीम स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे यांचे पथकाने यशस्वी पार पाडली.
पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.