संत साहित्याचे अभ्यासक मारुतीराव भाऊसो जाधव (गुरुजी) यांचे निधन

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोलाचं योगदान…

राधानगरी – तुकाराम गाथेचे निरूपणकार संत साहित्याचे गाढे अभ्यासक मारुतीराव भाऊसो जाधव यांचं नुसतेच निधन झाले आहे. त्यांच्या संत साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना शिवाजी विद्यापीठाचा पहिला पदमश्री डॉ. डी वाय पाटील पुरस्कार जाहीर झाला होता. मारुतीराव जाधव हे राधानगरी तालुक्यातील तळाशीसारख्या दुर्गम आणि शेतकरी कुटुंबात राहून ध्यासपूर्वक संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि इतर संतांच्या साहित्याचा अभ्यास करत होते.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनासाठी त्यांनी ‘तुकारामबोवांच्या गाथेचे निरूपण’ खंड एक आणि दोन हा सुमारे १८०० पृष्ठांचा आणि ‘कान्होबाची गाथा’ हा सुमारे ४०० पृष्ठांचा ग्रंथ लिहिलाय. त्यांनी निरूपण केलेली तुकारामबोवांची गाथा अल्पावधीत लोकप्रिय झाली असून त्याची दुसरी आवृत्तीही विद्यापीठानं नुकतीच प्रसिद्ध केलीय. त्याचबरोबर तळाशी गावातील मंदिराचा जिर्णोद्धार करण्याबरोबरच लोकजागृतीसाठी श्री ज्ञानेश्वरी व अध्यात्मावर ज्ञान देणारी ‘आनंदाश्रम’ संस्‍थेची त्यांनी स्थापना केली आहे.

सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी मोलाचं योगदान दिले आहे. शनिवारी सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं कोल्हापूरातील खाजगी दवाखान्यात दाखल केलं होतं आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उद्या सोमवारी सकाळी तळाशी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.