महिलांनी मानसिक आरोग्य सांभाळावे – डॉ. चैत्रा राजाज्ञा

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

महावितरणात महिला दिन उत्साहात…

कोल्हापूर – कौटुंबिक व व्यावसायिक आयुष्यात महिलांनी समतोल साधावा. स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्यासाठी प्राधान्याने वेळ द्यावा. आपल्या भावनिक व मानसिक आरोग्याबद्दल सजग रहावे,असा सल्ला मानसोपचार तज्ञ डॉ. चैत्रा राजाज्ञा यांनी दिला.

जागतिक महिला दिनाच्या औचित्याने महावितरणच्या कोल्हापूर परिमंडळ कार्यालयात ताराबाई पार्क कोल्हापूर येथे आयोजित कार्यक्रमात डॉ.राजाज्ञा बोलत होत्या. याप्रसंगी मंचावर स्वयंसिद्धा संस्थेच्या सदस्या सुरेखा उबारे, डॉ.नम्रता बिरजे, सहाय्यक महाव्यवस्थापक (प्र.) स्नेहा पार्टे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता वासंती भरते, वरिष्ठ व्यवस्थापक (मानव संसाधन) सुमन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास महावितरणच्या कोल्हापूर व सांगली मंडळातील महिला अधिकारी-कर्मचारी उपस्थित होत्या.

महिलांनी येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला धीरोदत्तपणे तोंड द्यावे आणि स्वतःचे संरक्षणाची काळजी घ्यावी, असे स्वयंसिद्धा संस्थेच्या सदस्या सुरेखा उबारे यांनी सांगितले. अँस्टर आधार हॉस्पिटलच्या वतीने कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा महिलांनी लाभ घेतला. सुत्रसंचलन सहाय्यक अभियंता स्मिता पवार यांनी केले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.