कार्यशाळेला या..! वेळ राखून ठेवा… तुमच्यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा..!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयामार्फत कार्यशाळेचे आयोजन…

कोल्हापूर – सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, कोल्हापूर द्वारा आयोजित न्यासांचे (ट्रस्ट) हिशोब पत्रकांबाबत मंगळवार 27 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 3 ते सायं. 6 या वेळेत देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, बिंदू चौक, कोल्हापूर येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन धर्मादाय सहआयुक्तांनी केले आहे.

कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक सनदी लेखापाल (C.A.) सुनील नागावकर हे सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमातील महत्त्वाच्या तरतुदी व न्यासाचे लेखापरीक्षण या विषयावर व सनदी लेखापाल (C.A.) संजय व्हनबट्टे हे सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था आणि आयात तरतुदी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळा धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. कार्यशाळा न्यासाचे विश्वस्त, वकील तसेच संबंधित कर्मचारी यांच्यासाठी मोफत असणार आहे, असेही धर्मादाय सह आयुक्त कार्यालयामार्फत पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.