सीपीआर प्रकरण- कारवाईला विलंब का? हे सारे संगनमताने की, काेणाच्या वरदहस्ताने- जयराज काेळी

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

काेल्हापूरः  छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील टेंडरमध्ये शासकीय बनावट दस्तावेज वापरून सांगमताने करोडो रुपये लाटणाऱ्यावर पालमंत्री कार्यवाही करून cpr अद्यावत करणारं की या बांडगुळांना पाठीशी घालणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. सीपीआरमधील प्रकरणाची सविस्तर माहिती देऊन ही अद्याप, वरिष्ठ स्तरावरून कारवाईला विलंब का केला जात आहे. यात नेमका हात कुणाचा आहे, हे जनतेला समजले पाहिजे, अशी मागणी पत्रकार परिषदेत माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत माहिती जिल्हाध्यक्ष जयराज कोळी यांनी केली हाेती. मात्र, याला अद्याप उत्तर दिले जात नसल्याने त्यांनी प्रशासन विराेधात तीव्र नाराजी व संताप व्यक्त करीत, यावर तातडीने खुलासा ना केल्यास, अन्य मार्गाने जाब विचारला जाईल असाही इशारा जयराज काेळी यांनी नुकताच दिला आहे. 

माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत CPR सर्जिकल स्टोर विभागास भेट देऊन कागदपत्रांची व 18 ऑक्टोबर रोजी झालेल्या Gem पोर्टल द्वारे टेंडर प्रक्रिये संबंधी माहिती जिल्हाध्यक्ष जयराज कोळी यांनी पाहिली असता यात मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार झालेला आढळून आले. त्यामुळे या सर्व प्रकरणाच्या मुळाशी जाऊन काेळी यांनी अधिक माहिती जमविली असून, त्याच माहितीच्या आधारे, त्यांनी प्रशासकीय यंत्रणा व पालकमत्री यांच्याकडे मागणी केलीय की, यातील दाेषींवर तातडीने कारवाई करावी. या मध्ये काेळी यांनी खालील मुद्दांवर अंगुली निर्देश दाखविला आहे. या प्रेस परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अमरनाथ शेणेकर,शरद पोवार,रणजित मोरे,अमृत पाटील, अनीस मुजावर,विनायक सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.

१. सदर टेंडर प्रक्रियेमध्ये पाच कंपनीने सहभाग नोंदवलेला होता त्यात न्यूटन एंटरप्राइजेस यांना टेंडर मंजूर करण्यात आलेला आहे. परंतु या फर्म प्रोप्रायटर यांनी अन्न व औषध प्रशासनाचे परवाना बनावट तयार करून या टेंडर प्रक्रियेमध्ये सादर केलेले आहे. या कागदपत्रांची कोणतीही छाननी न करता संगनमताने हे टेंडर या न्यूटन इंटरपाईजेस यांना हेतूपर्वक देण्यात आलेले आहे का असा सवाल त्यांनी केला आहे. 
२. अन्न व औषध प्रशासन यांना १८ डिसेंबर रोजी पत्रव्यवहार करून न्यूटन इंटरप्राईजेस प्रोप्रायटर अजिंक्य पाटील यांचे परवाना अथवा लायसन विषयी माहिती विचारले असता कोणतेही लायसन नसल्याचे माहिती अधिकारात उत्तर मिळाले आहे. त्यामुळे पुढे कारवाईला विलंब का केला जात आहे, असाही सवाल काेळी यांनी केला. 
३.सर्जिकल स्टोअर मध्ये आलेले साहित्य न्यूटन कंपनीसोबत केलेल्या करारातील ब्रँडचे नसल्याची शंकाही काेळी यांनी व्यक्त केलेली असून, सर्जिकल स्टोअर व्यवस्थापक यांनी ते स्वीकारलेल आहे. यात कराराचा भंग केलेला असून देखील कोणतीही कारवाई अथवा सूचना न्यूटन फर्म याना दिलेलं नाही, असाही ठपका काेळी यांनी पत्रकार परिषदेत ठेवला आहे. 
४. सदर टेंडर प्रक्रियेमध्ये खरेदी केलेले साहित्य व औषधे मार्केट रेटच्या कितीतरी पटीने जास्त असून, यामध्ये दराचा इतकी तफावत का अशीही विचारणा काेळी यांनी केलीय.
५. न्यूटन इंटरपाईजेस यांच कोणतेही अन्न व औषध प्रशासनाचा परवाना नसल्याचेही काेळी यांनी पत्रकार परिषदेत सांगताना,  टेंडर प्रक्रियेमध्ये के एम एस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी,पालघर तसेच इतर सर्व कंपनीया प्रक्रीयेत सहभागी का झाल्या आहेत, याचेही स्पष्टीकरण काेळी यांनी मागत, त्यांचा या सहभाग नसेल तर त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी काेळी यांनी केली.
६.या टेंडर प्रक्रियेचे बिल हे ई इन्व्हॉईस असावे लागते परंतु न्यूटन इंटरप्राईजेस यांनी एक्सेल शीट मध्ये कच्चे बिल बनवून दिलेले आहे आणि त्यावरती पेमेंट अदा करण्यात आले असल्याचे काेळी यांनी पत्रकारांच्या निदर्शनास आणून दिले आहे. . छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय मधील टेंडर GEM/2023/B/368147 आणि GEM/2023/B/3968302 या खरेदी प्रक्रियेमधील अधिष्ठता व खरेदी समितीतील सर्व सदस्यांनी मिळून हेतुपूर्वक न्यूटन इंटरप्राईजेस यांना कोणतेही अन्न औषध प्रशासनाचे लायसन नसताना देखील टेंडर हेतूपूर्वक मंजूर केले आहे का असा सवाल काेळी यांनी करीत, जर तसे असेल तर  खरेदी समितीतील सर्व सदस्यांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी.अशीही शेवटी काेळी यांनी मागणी केलीय. 
७. छत्रपती प्रमिला राजे रुग्णालमधील टेंडरमध्ये सहभागी होण्यासाठी न्यूटन इंटरप्राईजेस प्रोप्रायटर अजिंक्य पाटील यांनी हेतूपूर्वक शासकीय बनावट दस्तावेज बनवून सदर करोडो रुपयाच्या टेंडरचा लाभ उठवल्यामुळे त्यांच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून कार्यवाही करावी, अशीही मागणी काेळी यांनी पत्रकार परिषेदत शेवटी करत, यासंबंधीचे सर्व कागदपत्र त्यांनी पत्रकारांना दाखविली. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चाैकशी करून त्याचा खुलासा जनतेला करावा, अशी त्यांनी मागणी केलीय. कारण हा सर्व पैसा जनतेचा असून, याबाबत पारदर्शकता, या व्यवहारात असलीच पाहिजे, असेही काेळी यांनी स्पष्ट करत, यासंबंधीचा सर्व खुलासा करावा असे काेळी म्हणाले. 

 

सध्याचे सुरू असलेले राजकारण हे तुम्हाला प्रतिष्ठेचे व सत्याचे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.