शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS – बँक खाते लवकरच तपासा, जमा हाेणार – भरत कुंडल

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

चंदगड –शुभांगी पाटील

‘ओलम शुगर्स’ कडून ३१४४ रुपये ऊसदर जाहीर… गडहिंग्लज विभागात उच्चांकी ऊसदर…

चंदगड  – ऊस दराबाबत ओलमने कायमच शेतकऱ्यांचा हिताला प्राधान्य देत उच्चांकी दर दिला आहे. तूच परंपरा कायम राखत यंदाही गडहिंग्लज विभागात सर्वाधिक ऊस दर देणार असल्याचे बिझनेस हेड कुंडल यांनी सांगितले. ‘गळीत हंगामाच्या सुरुवातीलाच प्रतिटन ३१०० रुपये दर जाहीर केला होता. पण, त्यानंतर कोल्हापूर येथे झालेल्या ऊसदराच्या बैठकीत एफआरपी अधिक १०० रुपये देण्याचा निर्णय झाला होता. त्याअनुषंगाने ओलमची एफआरपी ३०४४ रुपये होती. त्यावर १०० रुपये असे ३१४४ रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे.

ओलम शुगर्स साखर कारखान्याकडे चालू गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसाला विनाकपात एकरकमी प्रतिटन ३१४४ रुपये दर देणार असल्याची माहिती कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी दिली. तसेच यापूर्वी गाळप झालेल्या उसाचे फरक बिल लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णयही कारखाना प्रशासनाने घेतल्याचे सांगितले.

यापूर्वी गाळप झालेल्या ऊसाला ३१०० रुपयांप्रमाणे बिले दिली असून त्यांचा ४४ रुपयांचा फरकही लवकरच त्यांच्या बँक खात्यावर जमा करणार आहे. १५ डिसेंबरपर्यंत गाळप झालेल्या ऊसाची बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहेत. तोडणी, वाहतुकीची बिलेही आठ दिवसात देण्याचे नियोजन केले आहे. कारखान्याने अवघ्या ६० दिवसांत २ लाख ८१ हजार ६०० मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. शेतकऱ्यानी ओलमला ऊस पाठवावा, असे आवाहन कुंडल यांनी केले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.