पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
दाजीपूर येथील ऋषिकेश जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून बारा लाख 97 हजाराचा केला मुद्देमाल जप्त सिंधुदुर्गातील सहा तर राधानगरी, तालुक्यातील एक असे सातजण केले अटक,, पोलीस निरीक्षक ईश्वरा ओमासे यांची कारवाई, दिली माहिती
राधानगरी – विजय बकरे
राधानगरी तालुक्यातील दाजीपूर येथील ऋषिकेश होम स्टे मध्ये विनापरवाना जुगार अड्डा वर खेळणाऱ्या कोकणातील सहाजण व राधानगरी तालुक्यातील एक अशा सात जणांकडून रोख रक्कम आणि क्रेटा गाडीसह बारा लाख 97 हजार मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सात जणांच्या वर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. याविषयी राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ईश्वरा ओमासे यांनी अधिक माहिती दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, दाजीपुर येथील ऋषिकेश होम स्टेरिसॉर्ट मध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाल्या नुसार रात्री दहा वाजता छापा टाकला. यावेळी घटनास्थळी रमी खेळ सुरू असल्याचे पाेलिसांना आढळले. कोकणातील किशोर वासुदेव सामंत, प्रकाश दत्तात्रय साळवी, मिलिंद श्रीधर कुबडे, बाळू अशोक बाने ,सर्व राहणार फोंडा घाट व प्रदीप अर्जुन पाटील राहणार माटेवाडा सावंतवाडी, आनंदा चिड्डाप्पा मेटी कुडाळ, हे सर्वजण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. तर एकजण राधानगरी तालुक्यातील वलवन येथील सागर आनंद खंदारे याचा समावेश आहे.
असे एकूण सात जणांकडून रोख रक्कम क्रेटा गाडीसह बारा लाख 97 हजाराचा मुद्देमाल पाेलिसांनी जप्त केलाय. या सात जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करून अटक केली आहे.याबाबतचा अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घेरडीकर, पोलीस कॉन्स्टेबल जठार हे करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ईश्वरा ओ मासे यांनी दिली.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.