CRIME संगनमताने केला घाेटाळा! पैसे न भरता ६५ लाखांचा गंडा…वाचा सविस्तर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

ऑडिटर्स सह दोषी संशयितांवर गुन्हा दाखल…

धुळे – जळगांव जिल्ह्यातील चाळीसगाव आणि पाचोरा येथील चार एटीएम मशिनमध्ये पैसे भरण्याची जबाबदारी घेऊन एटीएममध्ये पूर्ण रक्कम जमा न करता आणि संगनमताने पैसे काढत दोघांनी 64 लाख 82 हजार 200 रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. ऑडिटरने खोटा ऑडिट रिपोर्ट देऊन दोघांनाही मदत केल्याचे स्पष्ट झाले आहे. तिघांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

आजच वेळ घ्या… त्रासमुक्त व्हा

घटनेची माहिती अशी की, सेल्युलर व्हॅल्यू इंडिया लिमिटेड नाशिक कंपनीने चाळीसगाव व पाचोरा येथील चार बँकांच्या एटीएममधील पैसे भरण्यासाठी प्रवीण देविदास गुरव व दीपक भिकन पवार दोघे रा. आदित्यनगर, पाटणदेवी रोड, चाळीसगाव यांना कामावर ठेवले होते. आणि त्यांनी एटीएममध्ये जमा केलेली रोकड तपासण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लेखापरीक्षक चंद्रशेखर एकनाथ गुरव, (रा. गुजराल पेट्रोल पंपाजवळ, निवृत्ती नगर, जळगाव) यांची नियुक्ती करण्यात आली.

चाळीसगाव आणि पाचोरा येथील चार एटीएममध्ये रोख रक्कम भरण्यासाठी त्याने बँकांमधून वेळोवेळी काढलेल्या सुमारे ६४ टक्के रक्कम वापरली. एटीएम मशिनमध्ये 82 हजार 200 रुपये जमा करताना संपूर्ण रक्कम न भरता गंडा घातला. ऑडिट रिपोर्ट च्या दरम्यान ‘आज पर्यंत’च्या लेखापरीक्षणा दरम्यान ही बाब कंपनीच्या निदर्शनास आली असतानाही, ही बाब कंपनीच्या निदर्शनास न आणता लेखापरीक्षक चंद्रशेखर गुरव यांनी संशयित प्रवीण गुरव आणि दीपक पवार यांनी संगनमताने हा घोटाळा घडवून आणला. खोटे लेखापरीक्षण अहवाल देऊन कंपनीची फसवणूक केली. मे 2023 ते 16 डिसेंबर 2023 या कालावधीत असा घोटाळा झाला.

अशी फसवणूक लक्षात आल्यानंतर याप्रकरणी कंपनीचे ए. एस. ओ. व्यवस्थापक गोरखनाथ पोपट डोंगरे, रा. नाशिक यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करून फिर्यादीवरून संशयित प्रवीण देविदास गुरव, दीपक भिकन पवार आणि लेखा परीक्षक चंद्रशेखर एकनाथ गुरव यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४०८, ४०९, ४६८, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिघांही संशतियांना 19 डिसेंबर रोजी उशीरा अटक केली असून मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुहास आव्हाड पुढील तपास करीत आहेत.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.