तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
कोल्हापूर जिल्ह्यातील बसस्थानक सुशोभिकरणासाठी ३ उद्योजकांचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात..!
कोल्हापूर – महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळ राज्यातील ५८० बसस्थानकांना स्वच्छ, सुंदर बनवणार आहे. त्यासाठी ‘एस्.टी.’ बसस्थानक दत्तक योजना घोषित केली आहे. या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील २४ बसस्थानकांचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. यांसाठी उद्योजक, व्यापारी संस्था यांच्याकडे सूचना मागवण्यात आल्या आहेत. या उद्योग संस्थांनी संबंधित बसस्थानके स्वखर्चाने विकसित, देखभाल-दुरुस्ती करावयाची आहेत. या अंतर्गत ३ उद्योजकांचे प्रस्ताव अंतिम टप्पात असून लवकरच कोल्हापूर शहर, जयसिंगपूर आणि चंदगड बसस्थानकांचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. यातील चंदगड बसस्थानक रंगवून पूर्ण होत आले आहे, अशी माहिती राज्य परिवहन मंडळाच्या स्थापत्य विभागातून देण्यात आली.
आजच संपर्क साधा..करिअर बनवा!
राज्य शासनाने १ मेपासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर अभियान चालू केले आहे. या अंतर्गत दत्तक देण्यात येणारी बसस्थानके स्वच्छ करणे, त्यांची रंगरंगोटी करणे, स्वच्छतागृह स्वच्छ यांसह अन्य गोष्टी करणे महामंडळाला अपेक्षित असून त्याच्या मोबदल्यात संबंधित उद्योजकांनी त्यांच्या उत्पादनांचे विज्ञापन करणे शक्य होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बसस्थाकांचे अंतर्गत रस्ते सिमेंट-काँक्रीटचे करण्यासाठी २२ कोटी ८० लाख रुपये संमत आहे.
लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व बसस्थानकांचे अंतर्गत रस्ते सिमेंट-काँक्रीटचे केले जाणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात गारगोटी ७ कोटी रुपये, इचलकरंजी ४.३० कोटी रुपये, जयसिंगपूर २.५० कोटी रुपये, नृसिंहवाडी ३ कोटी रुपये, राधानगरी ६ कोटी रुपये, असे २२ कोटी ८० लाख रुपये संमत करण्यात आले आहेत. याचसमवेत जिल्ह्यातील ११ बसस्थाकांपैकी ५ बसस्थकांमध्ये ‘पेव्हिंग ब्लॉक’ बसवण्याचे काम चालू आहे, तसेच अंतर्गत खड्डेही भरण्याचे काम चालू आहे.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.