कोल्हापूर जिल्ह्यातील १४ हजार, ८०० शेतकऱ्यांचे ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

अंबाबाई तीर्थस्थळ विकास आराखड्याचेही ४० कोटी महापालिकेकडे वर्ग पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती…

कोल्हापूर – जिल्ह्यातील १४ हजार, ८०० शेतकऱ्यांचे ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान अनेक दिवसांपासून तांत्रिक कारणास्तव अडकून पडले होते. ते मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. याबाबतचे आदेश उद्याच निघतील. तसेच; करवीर निवासिनी श्री. अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचेही ४० कोटी कोल्हापूर महापालिकेला वर्ग झाल्याची माहिती, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. पंधरवड्यापूर्वी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी या दोन्ही गोष्टींची पूर्तता करून देण्याच्या शब्दाची वचनपूर्ती केली आहे, असेही मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या आदेशावरती सह्या झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाविकास आघाडीमध्ये अर्थमंत्री असताना त्यांनी अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ४५ कोटी रुपयांची घोषणा केली होती. त्यापैकी पाच कोटी रुपयांचा निधी आला होता, ४० कोटी रुपयांचा निधी राहिलेला होता. या सरकारमध्ये ते परत अर्थमंत्री होताच त्यांनी ४० कोटी रुपयांची पुरवणी मागणी मंजूर करून निधी कोल्हापूर महानगरपालिकेला पाठवलेला आहे.

पंधरवड्यापूर्वी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या दोन्ही गोष्टी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पूर्ण करू, असे अभिवचन दिले होते. दरम्यान; उद्यापासूनच अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच हे वचन अजितदादांनी पूर्ण केले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फार मोठे सहकार्य केले, अशी कृतज्ञताही पालकमंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.