कुंभोज -विनोद शिंगे
संजय घोडावत पॉलिटेक्निक आणि इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई ) “निंबस – २०२२” या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धेचे उद्घाटन संजय घोडावत पॉलिटेक्निकचे प्राचार्य विराट व्ही. गिरी यांनी केले. तर प्रमाणपत्राचे वितरण संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांच्या हस्ते विजेत्यास प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
निंबस-२०२२ या स्पर्धेस राज्यातून ८०० स्पर्धेकांनी सहभाग नोंदवला होता. या मध्ये कॅड-बस्टर्स विजेता वीरेंद्र भोसले, उपविजेता नेहा कुंभार, बाइट कोडार्स विजेता अंशुल गीड, अथर्व तांबडे, उपविजेता आकांक्षा चोडणकर, निरंजन कुडाळकर, ट्रबल शुटिंग विजेता तन्मयी कुलकर्णी, ऋषिकेश महाजन उपविजेता प्रणम्य स्वामी, सुपार्श्व बिरनाळे. बेस्ट आऊट ऑफ ई वेस्ट विजेता जान्हवी पोवार, स्नेहल शिंदे उपविजेता दृष्टी वनकुद्रे, धनश्री माने, पोस्टर प्रेझेंटेशन विजेता रोहन शिंदे, उपविजेता अक्षता नायक. मॉक कॅम्पस ड्राइव्ह विजेता प्रथमेश होळवण उपविजेता नेहा पाटील. क्युझ कॉम्पेटेशन विजेता निर्झरा माणदे, देवर्ष रावराणे उपविजेता प्रथमेश बिरजे आशिष चौघुले. पेपर प्रेझेंटेशन विजेता श्रीशैल रुग्गे, ख़ुशी बोरा उपविजेता वेंकटेश यशवंत. या स्पर्धकांनी प्राविण्य मिळविले आहे.
सुमारे एक लाखापर्यंतची बक्षीशे आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली. या स्पर्धेसाठी नामांकित उद्योजक अनअकॅडेमी, चकोते ग्रुप नांदणी, निखिल सर्विसेस जयसिंगपूर, बगौस सांगली, बीएम टेक-स्टोअर, कॉलीटास टेक्नो सोल्युशन, लक्ष्मी होंडा-अतिग्रे, गोपी स्पोर्ट इचलकरंजी,त साई डिजिटल इस्लामपूर, मेजर कलेक्शन कोल्हापूर, साई सर्विस इचलकरंजी, सनबीट, सलगर अमृतुल्य चहा कोल्हापूर, रेमंड शॉप बेळगाव, यांनी प्रायोजक म्हणून सहकार्य केले.या स्पर्धेस विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले व प्राचार्य विराट गिरी यांनी विजेत्या स्पर्धकास शुभेच्छा दिल्या आहेत.