संक्रांत साठी सुगड्या बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात
शिराळा (जी.जी.पाटील)
भारतीय परंपरेतील अनमोल ठेवा असणारा सण म्हणून मकर संक्रात सण ओळखला जातो त्यामुळे हा सण अगदी काही दिवसांवर येवुन ठेपल्याने या दिवशी सुवासीनीचे वाण देण्यासाठी घरोघरी लागणार्या सुगड्या (खण) बनविण्यासाठी लगबग सध्या सुरु सुगड्या बनविण्याचे काम अंतीम टप्यात आले असुन कुंभारवर्ग सुगड्या बनविण्याच्या कामात मग्न असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
नविन वर्षात येणारा मकर संक्रात हा सण कुंभार बांधवांच्या आयुष्यात गोडवा आणण्याचे काम करतो त्यामुळे कुंभार समाजाच्यादृष्टीने या सणाला अधिक महत्व आहे.मकर संक्रातीदिवशी सुवासिनी एकमेकींना वाण देतात यासाठी ज्या मातीच्या भांड्याचा वापर केला जातो त्यास सुगड्या असे संबोधले जाते त्यामुळे या सणामध्ये सुगडी(खण) यांचे महत्व असुन ग्रामीण भागामध्ये आजही सर्रास त्याचा वापर केला जातो. सोनवडे,चरण,मोहरे,कोकरुड,बिळाशी,गवळेवाडी येथील कुंभारवर्ग मकर संक्रातीसाठी लागणार्या सुगड्या बनविण्याच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.पुर्वी पारंपारीक पध्दतीने हाताने फिरवता येणार्या मातीच्या चाकावर सुगड्या बनवल्या जात होत्या मात्र आधुनिक युगात ती पारंपारिक पध्दतही हळुहळु लोप पावत चालली असुन सध्या यात्रिक चाकावर सुगड्या बनविण्याचे काम गतीने सुरु आहे.
मातीच्या चिखलापासुन बनविण्यात येणार्या सुगड्या सुकण्यासाठी व भट्टीतुन भाजण्यासाठी बराच कालावधी लागतो त्यामु संक्रातीपुर्वी महिनाभर अगोदरच सुगड्या बनविण्याच्या कामास सुरुवात होते . शिराळा तालुक्याच्या पश्चीम भागातील कुंभारवाड्यात सुगड्या बनविण्याची लगबग सुरु आहे.
कोट – कुंभार समाजासाठी पुर्वि मातखणी ची जागा होती.ती आता राहिलीच नाही.शासनानेच मातखणीची कुंभार समाजाची जमिन उपलब्ध करून द्यावी.सध्या माती मिळत नाही.त्यामुळे मडकी,गणपती,संक्रांत साठी सूगडी,लग्नकार्यातील वही बांधणे अशा कामाना माती नसल्याने हा व्यवसाय करणे अडचणीचे ठरत आहे.काही कुंभारानी कामच बंद केलय.
दादू चंद्रू कुंभार सोनवडे जेष्ठ नागरिक