काेल्हापूरः पाँझिटीव्ह वाँच टीम
स्थानिक गुन्हे शाखेची माेठी कारवाई
काेल्हापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेशनने माेठी यशस्वी कारवाई करताना, येथील पुणे बेंगलाेर महामार्गावर साफळा रचून व्हेल माशाची उलटी बेकायदा जवळ बाळगून ती विक्रीसाठी पुणे – बेंगलोर महामार्गावरुन जाणाऱ्या तिघांना त्यांच्या कारसह शिताफीने पकडले आहे. मिळालेल्या खऱ्या माहितीनुसार पाेलिसांनी यशस्वी कामगिरी करत काेल्हापूर पाेलीस बेस्ट असल्याचे दाखवून दिले आहे. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसाना अधिक मिळाली होती.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस आणि वन विभागाच्या पथकाने पुणे- बेंगलोर महामार्गावर सरनोबतवाडी येथे साफळा रचून व्हेल माशाची उलटी घेवुन जाणार्या तिघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून शुक्रवारी ४ नोव्हेंबर रोजी पुणे बंगळूर हायवे लगत सरनोबतवाडी येथे काही लोक हे प्रतिबंधीत व्हेल माशाची उल्टी (अंबरग्रीस) विक्री करीता घेवून येणार आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांचे मार्गदर्शन प्रमाणे पथकाने पुणे बंगळूर हायवे लगत सरनोबतवाडीचे सर्व्हिस रोडवर येथे सापळा रचून आपल्या चाणाक्ष नजेरत अखेर सावज हेरले.. क्षणाचाही विलंब न करता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील अमलदार सहा. फौजदार श्रीकांत मोहिते व पो. कॉ. वैभव पाटील यांना मिळालेली माहिती खरी करून दाखविली.
पाेलिसांनी या केलेल्या कामगिरीचे सर्वत्र काैतुक हाेत आहे.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांचेसह पोलीस अमलदार पोलीस उप निरीक्षक विनायक सपाटे, शेष मोरे, पोलीस अमंलदार श्रीकांत मोहिते, वैभव पाटील, विजय गुरखे, सचिन देसाई, हिंदुराव केसरे, अनिल पास्ते, दिपक घोरपडे, सोमराज पाटील, प्रदिप पोवार, उत्तम सडोलीकर, रफिक आवळकर यांनी वनअधिकारी करवीर रेंजचे आर.एफ.ओ. रमेश शकंर कांबळे व वनपाल विजय ईश्वरा पाटील यांचेसह केली आहे.
संपूर्ण पथकाने माेठ्या शिताफीने सर्वांना ताब्यात घेतले. यावेळी पाेलीस पथकाने, वाहन हुडाई एसेंट कार नं. MH १२- NB ०८३२ ही आडवून त्यातील प्रदिप शाम भालेराव वय ३६, रा. शहाजीनगर, अजीज बाग, आर.सी.मार्ग, मावळ रोड, चेंबूर, मुंबई , शकील मोईन शेख वय ३४रा. सर्वे नं. १०, माणिकनगर, येरवडा, पुणे आणि अमीर हाजू पठाण वय ३२ रा. सर्वे नं.५७, विश्रांतीवाडी, भैरवनगर, गणपती मंदिर जवळ, पुणे यांना ताब्यात घेतले.
सुरुवातीला त्यांनी काहीच माहिती नसल्याचे आपण त्यातील ताे मी नव्हेच असा आवेश आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, पाेलिसांना मिलालेली माहिती पक्की असल्याने, पाेलीस खाक्या दाखविताच. संशयित अगदी पाेपटासारखे बाेलू लागले. यावेळी त्यांनी गुन्हा कबूल केला. यावेळी त्यांच्याकडून ३,४१,३०,००० /- ( तीन कोटी एक्केचाळीस लाख, तीस हजार) रुपये किमतीचे ३ किलो ४९३ ग्रॅम वजनाचे प्रतिबंधीत असलेली व्हेल माशाची उल्टी (अंबरग्रीस) सह गुन्हयात वापरलेली हुंडाई कार मोबाईलसह एकूण ३,४४,६५,१००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीत यांना मुद्देमालासह गांधीनगर पोलीस ठाणेकडे ताब्यात देणेची कार्यवाही सुरु आहे.