दशरथ खुटाळे – शाहुवाडी
राज्य शासना विरुद्ध शिवसेना राष्ट्रवादीचा मलकापुरात मशाल एल्गार.. रस्ता रोको
मलकापूर येथे आज काही काळ वातावरण अचानक तंग बनले हाेते. चारी बाजूने शिवसेना, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर जमल्याने एकच गर्दी झाली आणि बघता बघता मलकापूर रस्ता राेखला गेला.उद्धब बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी यांच्या संयुक्त विद्यमाने याठिकाणी शासनाच्या विराेधात, घाेषणा देत, शासनाचा निषेध नाेंदवित रस्ता राेकाे करण्यात आला. नेमका हा रस्ता का राेखण्यात आला. ताे वाचा सविस्तर वृत्तांमध्ये.
ओला दुष्काळ जाहीर करा, आनंदाचा शिधा तात्काळ घरपोच करा, मुख्यमंत्री सडक मधील रस्त्याची कामे सुरू करा, वीस पटाच्या आतील शाळा बंद करू नका, पाणी योजनेची कामे तात्काळ सुरू करा, अशा विविध मागण्यासाठी आज सरकारच्या विरुद मलकापूर रत्नागिरी महामार्गावर ती मलकापूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हा बँकेचे संचालक रणवीर सिंह गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मशाल यलगार रस्ता रोको करण्यात आला. यावेळी बोलताना माजी आमदार सत्यजित पाटील म्हणाले, हे खोके सरकार व लबाड सरकार असून जनतेचा विश्वास यांच्यावरील उडाला आहे.
- विकास कामात खिळ घालणाऱ्या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. ढाल तलवार चिन्ह मिळालेल्या शिंदे सरकारमध्ये सत्तेसाठी अंतर्गत धूसमूस सुरू असून त्यांच्याच अंतर्गत भांडणांमध्ये एकमेकांना वाचवण्यासाठी त्यांना ढाल तलवार उपयोगी पडणार आहे. वाड्या वस्तीवरील वीस पटाच्या आतील शाळा बंद करू देणार नाही. रस्त्यांसह इतर विविध मूलभूत वाड्या वस्तीवरील विकासकामे रोखू नका. उद्धव सरकारच्या काळातील विकास कामे रोखणे हाच एककलमी कार्यक्रम शाहूवाडी सह जिल्ह्यात दिसत आहे. यामध्ये अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे यावेळी बोलताना सत्यजित पाटील म्हणाले.
शाहुवाडी तालुक्यातील वाड्या वस्तीवरील रस्ते वीज पाणीपुरवठा योजना या जाणीवपूर्वक का थांबवल्या जात आहेत. अनेक योजना उद्धव सरकारच्या काळातील असताना केवळद्वेषापोटी तालुक्यातील काही लोकप्रतिनिधी आडवे येत आहेत .यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते रणवीर सिंह गायकवाड म्हणाले गद्दारी करून गेलेल्यांची परवा करायची नाही. शिवसेनेशी एकनिष्ठ राहणारे माजी आमदार सत्यजित पाटील हे उद्याचे आमदार असणार आहेत हे गद्दारांनी लक्षात ठेवावे.
- माजी सभापती विजय खोत म्हणाले शाहूवाडी तालुक्याच्या मूलभूत रस्ते वीज पाणीपुरवठा व इतर कामात विकास कामात काही अधिकारी ही काही लोकप्रतिनिधींच्या सांगण्यावरून खोळंबा घालित आहेत. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. यावेळी प्रकाश कांबळे बोलताना म्हणाले शिवसेनेच्या जीवावर निवडून गेलेले खासदार धैर्यशील माने हे गद्दार निघाले त्यांना शह देण्यासाठीच पुढील काळात रणवीर सिंग गायकवाड हे लोकसभेला उमेदवार असतील अशा गद्दारांना आपण धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पंडितराव शेळके जि प सदस्य हंबीरराव पाटील शिवसेना तालुकाप्रमुख दत्ता पवार शिवसेना उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी यांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन दिनकर लोहार यांनी केले .
- यावेळी उपस्थित शिवसेनिकांनी घोषणेसह परिसर दणाणून टाकला यावेळी बऱ्याच कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतामध्ये काही विकास कामे तटवल्याबद्दल अधिकाऱ्यांच्या वर मनोगतातून रोष व्यक्त केला. आज मलकापूरचा आठवडी बाजार असल्याने काही काळासाठी वाहतुकीचा खोळंबाही झाला .यावेळी राज्य शासनाच्या निषेधार्थ शिवसेनेचे व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. जि प सदस्य हंबीरराव पाटील ,जि प सदस्य विजय बोरगे ,माजी सभापती विजय खोत, पंडितराव शेळके, महादेव पाटील ,प्रकाश कांबळे नामदेव गिरी, प्रकाश पाटील, राष्ट्रवादीचे नेते महादेवराव पाटील गणि तामनकर, तालुकाप्रमुख दत्ता पवार ,दिनकर लोहार, योगेश कुलकर्णी, महिला आघाडीच्या आलखा भालेकर, पुनम भोसले, आधी बहुसंख्य शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
- पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली राधानगरीच्या पोलीस उपनिरीक्षक अनुराधा पाटील यांच्या सह शाहूवाडी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. यावेळी संबंधित विभागाचे काही अधिकारी वेळेत हजर न राहिल्याने शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले व आपल्या जागेवर ठाम राहिले. यावेळी काही काळ तणावही निर्माण झाला यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील रणवीर सिंग गायकवाड पैलवान विजय बोरगे पाटील दत्ता पवार नामदेव गिरी दिनकर लोहार आदी शिवसैनिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी दोन तास वाहतुकीचा खोळंबा झाला. शेवटी कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोडून दिले.