बांबवडे: दशरथ खुटाळे
शाहूवाडी तालुक्यात बोगस डॉक्टरांचे जणू जाळेच निर्माण झाले आहे. तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या आरोग्याशी खेळ मांडला आहे. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने छापे टाकून अशा डॉक्टरांच्या मुसक्या आवळणे गरजेचे बनले आहे.काही दिवसांपूर्वी बांबवडे येथे झालेल्या कारवाईत शिराळा तालुक्यातील एका बोगस डॉक्टरचे पितळ उघडे पडले तर, भेडसगाव येथील बोगस डॉक्टरने वैद्यकीय पथकाची चाहूल लागताच तेथून पलायन केले. यामुळे या ठिकाणी बाेगस डाँक्टरांचे अद्यापही जाळे असल्याचे चर्चिले जात आहे. त्यामुळे आराेग्य विभागाने साफळा रचून अशा बाेगस डाँक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी पुढे येत आहे.
अशा या बोगस डॉक्टरांच्या चुकीच्या औषधोपचाराने गोरगरीब रुग्णाचे आरोग्य धोक्यात येत आहे. मोठ मोठ्या दवाखान्यातील डॉक्टरांच्या हाताखाली कंपाउंडर म्हणून चार-सहा महिने काम केलेले आता हातात बॅगा घेऊन अगदी रुबाबात मिरवत आहेत. तर तालुका भर 15 ते 20 जण या व्यवसायात सक्रिय असल्याचे बोलले जात आहे अशा बोगस बहाद्दर डॉक्टर वर आरोग्य विभागामार्फत कारवाई करणे आता गरजेचे बनले आहे. वास्तविक, पाहता आराेग्य विभाग अशा बाेगस डाँक्टरांवर पाळत ठेवून असतातच. आराेग्य विभागाकडे अधिकृत डाँक्टरांची नाेंदणीही असते. तरीही काहीजण आराेग्य विभागाचा डाेळा चुकवून बिनधिक्कतपणे ग्रामीण भाग शाेधून, सराव करताना दिसत असतात.