WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

जन औषधी दिन साजरा न करता…एक दिवस प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे या ठिकाणी रुग्णांना जेनेरिक औषधे उपलब्ध करुन द्या-संजयसिंह चव्हाण

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

लोकांनी जास्तीत-जास्त जेनेरीक औषधांचा उपयोग करावा – संजयसिंह चव्हाण

सूत्रसंचालन डॉ. सुनेत्रा शिराळे यांनी तर आभार प्रभारी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने यांनी मानले. यावेळी सेवा रुग्णालयातील डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व रुग्ण उपस्थित होते.

कोल्हापूर : डॉक्टरांनी रुग्णांना प्रिस्क्रिप्शन लिहून देताना रुग्णाला आवश्यक मॉलिक्युल, कंटेन्ट लिहून द्यावा. जास्तीत-जास्त लोकांनी जेनेरीक औषधांचा उपयोग केला पाहिजे, यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न करावा. वर्षातून एकदा जन औषधी दिन साजरा न करता आठवड्यातून एक दिवस प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे या ठिकाणी रुग्णांना जेनेरिक औषधे उपलब्ध करुन द्यावीत. यासाठी जिल्हा परिषदेमार्फत सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.

7 मार्च जन औषधी दिनानिमित्त सेवा रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास उपसंचालक आरोग्य डॉ. प्रेमचंद कांबळे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील कुरुंदवाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, अन्न व औषध निरीक्षक मनोज अय्या, जिल्हा मेडीकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. गीता पिल्लाई, जेनेरिक असोसिएशनचे रवी बिडकर, सेवा रुग्णालयाचे डॉ. उमेश कदम उपस्थित होते.

डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनमध्ये रुग्णाला आवश्यक औषधांचे मॉलीक्युल लिहून दिले, त्यातील कंटेन्ट लिहून दिले तर त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार तो रुग्ण ते औषध घेवू शकेल. औषधे कोणती घ्यायची हा चॉईस रुग्णाचा असेल. शासनाने यासाठी मदत केली आहे. मेडिकल क्षेत्रातील लोकांनीही याला मदत करणं गरजेच आहे. सामाजिक बांधिलकीपोटी आपण जास्तीत-जास्त जेनेरीक औषधांचा वापर करायला हवा. ग्रामीण भागातील रुग्णांपर्यंत जेनेरीक औषधे पोहचवा. त्यांचा या औषधांप्रति विश्वास निर्माण व्हायला हवा. सर्व खासगी व शासकीय डॉक्टरांनी जेनेरीक औषधे असलेले प्रिस्क्रिप्शन लिहून दिले व सर्वसामान्यांना ही औषधे उपलब्ध करुन दिली तर पंतप्रधान मोदी यांना अपेक्षित जनसामान्यांना परवडणारी औषधे उपलब्ध करुन देणे सार्थ होईल. सर्वसामान्य जनतेला परवडतील अशी औषधे उपलब्ध करुन देण्यात आपण योगदान दिले पाहिजे. रुग्णालयातील उपस्थित सर्व रुग्णांना आज मोफत औषधे दिली जाणार आहेत याचा सर्वांनी लाभ घ्यावा.  

मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण

दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. डॉ. कदम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांनी जन औषधी दिनानिमित्त पालकमंत्र्याच्या संदेशाचे वाचन केले. अन्न व औषध निरीक्षक श्री. अय्या यांनी जन औषधांबद्दल माहिती दिली. यावेळी सेवा रुग्णालयातील चार रक्तदाब व मधुमेही रुग्णांना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण यांच्या हस्ते एक महिन्याची जेनेरिक औषधे मोफत देण्यात आली.

  • आरोग्य उपसंचालक कांबळे म्हणाले, रक्तदाब, मधुमेह या आजारांचे प्रमाण जास्त आहे. 30 ते 40 टक्के रुग्ण या आजाराने पिडीत आहेत. याला आपली जीवनशैलीच कारणीभूत आहे. या आजारांवरील खर्च सर्व सामान्यांना न परवडणारा आहे. जेनेरीक औषधे प्रभावी असून त्याचा सर्वांनी उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा मेडीकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. पिल्लाई म्हणाल्या, रक्तदाब, मधुमेह या आजारांवरील औषधांची किंमत जास्त आहे. या औषधांचा खर्च सर्वसामान्य रुग्णांना न परवडणारा आहे. त्यामुळे सर्वांनी डॉक्टरांकडे जेनेरीक औषधं लिहून देण्याचा आग्रह धरायला हवा व सर्वसामान्यांपर्यंत जेनेरीक औषधे पोहचवायला हवीत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

सूत्रसंचालन डॉ. सुनेत्रा शिराळे यांनी तर आभार प्रभारी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने यांनी मानले. यावेळी सेवा रुग्णालयातील डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व रुग्ण उपस्थित होते.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी