WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

जगाच्या पाठीवर डेअरी उद्योगात भारताला सर्वाधिक संधी

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी नियोजन आणि कालबद्ध कृती कार्यक्रम राबविण्याची गरज

इंडियन डेअरी फेस्टिव्हल  २०२३ चे आयाेजन

जगाच्या पाठीवर डेअरी उद्योगात भारताला सर्वाधिक संधी आहे. आज जगातील एकूण दूध उत्पादनाच्या २३% उत्पादन भारतात होते. २०३३ पर्यंत तो ३३% पर्यंत जाईल तर २०६७ पर्यंत जगातील ६८% दुधाचे उत्पादन एकट्या भारतात होईल. पण पारंपारिक उंबरठ्यावर उभे राहून आपण आगतिक स्पर्धेला सामोरे जाऊ शकत नाही. यासाठी स्वतामध्ये आवश्यक ते बदल करणे आवश्यक आहे. निर्माण झालेल्या जागतिक स्पर्धेला यशस्वीपणे तोंड द्यायचे असेल आणि आपली हक्काची बाजारपेठ कायम ठेवून जगाच्या बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करायचे असेल तर दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी नियोजन आणि कालबद्ध कृती कार्यक्रम राबविण्याची गरज आहे.

  • राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ  कोल्हापूरात इंडियन डेअरी फेस्टिव्हलचे आयोजन
  • नव्या धवलक्रांतीसाठी डेअरी क्षेत्रातील सर्व घटक एकाच व्यासपीठावर

कोल्हापूर इंडियन डेअरी असोसिएशन आणि नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्या सहकार्याने कोल्हापूर येथे दिनांक २० ते २२ जानेवारी २०२३ रोजी इंडियन डेअरी फेस्टिवल – २०२३ चे आयोजन केले आहे. “नांदी नव्या धवल क्रांतीची” हे घोषवाक्य घेऊन आणि सद्यस्थितीतील पशुधन आणि डेअरी क्षेत्रातील उपलब्ध पायाभूत सुविधांच्या बळावर अधिक आणि गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन, संकलन आणि प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर आणि यातून फायदेशीर पशुपालन आणि डेअरी उद्योग हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून फेस्टिवल मध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संघ, देशातील डेअरी उद्योगातील सर्व सहयोगी घटक सहभागी होणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या फेस्टिवल मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर विभागात प्रथमच अशा प्रकारच्या फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले आहे.

देशातील दुग्ध व्यवसायासमोरील संधी, आव्हाने, दूध उत्पादनात वाढ आणि २०३० पर्यंतची ध्येयधोरणे ठरवण्यासाठी या क्षेत्रातील तज्ञ, सर्व घटक आणि शासन व्यवस्था यांना एकत्रित घेऊन हॉटेल सयाजी येथे दूध परिषदेचे आयोजन केले आहे. या सोबत दूध उत्पादक शेतकन्यापासून, दूध संस्था, दूध प्रक्रिया संघ आणि ग्राहक या सर्व घटकांना लागणारी आवश्यक माहिती, तंत्रज्ञान एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी शाहूपुरी जिमखाना मैदानावर भव्य डेअरी एक्स्पो होणार आहे.

१९७० ते १९९६ पर्यंत एकूण २६ वर्षे कार्यरत असणाऱ्या ऑपरेशन फ्लडच्या माध्यमातून भारत जगातील सर्वांत मोठा दूध उत्पादक देश बनला. डेअरी हा आता फक्त कृषी पूरक उद्योग राहिला नाही. या उद्योगाचे एक स्वतंत्र स्थान निर्माण झाले आहे… जी.डी.पी. मधील त्याच्या योगदानातून या क्षेत्राने ते सिद्ध केले आहे. आज महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यातील ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था दूध व्यवसायावर अवलंबून आहे. सहकाराची कास धरत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जिल्हा आणि तालुका दूध संघ निर्माण झाले. अलीकडच्या काळात पशुसंवर्धन आणि दूध प्रक्रिया उद्योगात खासगी क्षेत्राने मोठ्या प्रमाणात केलेल्या भांडवली गुंतवणूक, नवे तंत्रज्ञान, आधुनिक यंत्र सामुग्री याच्या जोरावर बऱ्याच खासगी संस्थांनी बाजारपेठेतील आपला वाटा वाढवण्यास सुरवात केली. यामुळे डेअरी उद्योगाचा विस्तार झाला. या सर्व गोष्टी सकारात्मक दिसत असल्या तरी नैसर्गिक संकटे, जागतिक स्पर्धा, धोरणे, व्यावसायिक दृष्टिकोन आणि भविष्यकालीन नियोजनाविषयी अभाव, या सर्वामुळे अमर्याद संधी असणाऱ्या या व्यवसायासमोर नवनवीन आव्हाने देखील निर्माण झाली आहेत. काळानुसार बदलणारी व्यावसायिक समीकरणे जुळवण्यात त्यातील बहुतांश दूध संघाना अपयश आले.

  • या उद्योगात काम करणाऱ्या आणि हा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या सर्वांना पशुसंवर्धन आणि डेअरी उद्योगाची माहिती करून देणारे एक पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमांचे एका व्यापक चळवळीत रूपांतर करण्यासाठी विविध माध्यमातून याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी पुढील एका वर्षातील उपक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे. नव्या पिढीचा सहभाग या क्षेत्रात वाढवण्यासाठी या उद्योगाचे अर्थकारण, तंत्र, महत्व आणि मार्गदर्शन समजून देण्यासोबत सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये डेअरी उद्योगाचा वाटा वाढवण्याच्या दृष्टीने सुरु असलेल्या प्रयत्नांना गती देण्याच्या दृष्टीने या फेस्टिवलचे महत्व अनन्यसाधारण आहे.

सद्यस्थितीला काही अलीकडच्या काळात दूध उत्पादकांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, वातावरणातले बदल याचा पशुपालनावर मोठा परिणाम होत आहे. आपल्याकडे पशुसंवर्धन मोठ्या प्रमाणावर होत असले तरी हा शेती पूरक व्यवसाय म्हणूनच केला जातो. १-२ जनावरांमुळे हा व्यवसाय फायद्यात येत नाही. चारा उपलब्धतेचा अभाव, पशु खाद्याचे वाढलेले दर, दुधाला मिळणारा भाव, उत्पादनातील चान्यावर खर्च होणारी ७०% रक्कम, देखभाल आणि उत्पादन खर्चात होत असलेली मोठी वाढ यामुळे छोटचा दूध उत्पादकांना हा व्यवसाय करणे जिकीरीचे बनले आहे. या व्यवसायाला अनेक पैलू असल्याने दरासाठी विशिष्ट निकष कायम करता येत नाहीत त्यामुळे दुधाला सरसकट हमीभाव देणे इतके सोपे नाही.

शेतकरी कुटुंबातीलनवी पिढी हा पारंपारिक शेती पूरक व्यवसाय करण्यात नाखूष आहे. राज्यातील अनेक दुधाळ जनावरे कुपोषित आहेत त्याचे निराकरण केल्याशिवाय कमी खर्चात दुधाचे अधिक उत्पादन घेता येणार नाही. व्यावसायिक पातळीवर देखील नवनवीन आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. गुणवत्तापूर्ण दूध संकलनाचा अभाव, दूध दरातील फरकामुळे उत्पादकांकडून म्हैशीच्या दूधात गायीच्या दुधाची होणारी भेसळ, फेंट आणि एस.एन.एफ. वाढीसाठी साखर युरिया यासारखी भेसळ, काही व्यापान्यांकडून होणारी रासायनिक पदार्थांची भेसळ आणि कृत्रिम दुधाची निर्मिती, यामुळे जागतिक स्पर्धेला तोंड देण्यासाठी आवश्यक गुणवत्ता राखण्यात अपयश येत आहे. यामुळे या व्यवसायातील अडचणीत वाढ झाली आहे.

शासन व्यवस्था, दूध संस्था, दूध उत्पादक यांच्यासह या व्यवसायाशी निगडीत सर्व घटकांनी एकत्रितपणे लोकचळवळ उभी करावी लागेल आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करण्यासाठी यामध्ये सातत्य राखण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. यासाठीच हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दूध उत्पादक, सर्व दूध संस्था आणि डेअरी उद्योगातील सर्व घटकांच्या दृष्टीने या फेस्टिवलचे आयोजन हा अतिशय महत्वाचा भाग मानला जातो.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी