कुंभोज -विनोद शिंगे
वनविभागाचे पथक गुरूवारी सकाळीच गडावर दाखल झाले.वनविभागाच्या हद्दीतील बुरजाजवळील दस्तगिर इस्माईल मुजावर यांचे तर पायथ्याचे पांडूरंग धोंडू धुमक यांचे थंड पेयाचे दुकान जमिनदोस्त केले.पक्क्या बांधकामाचे नुकसान होवू नये म्हणून पायथ्याच्या एक एकरातील वीस जणांनी आपली अतिक्रमणे पंधरा दिवसात काढून घ्यावीत . असा अल्टीमेट जिल्हा उपवनसंरक्षक जी.गुरूप्रसाद यांनी पायथ्याला अतिक्रमणधारकांची बैठक घेऊन दिला.तातडीने झालेल्या या कारवाईमुळे गडावर अतिक्रमण धारकाचे धाबे दणाणले आहेत.
जिंकण्याची तयारी सुरु…कोरोची ग्रामपंचायत प्रचार शुभारंभ
विशाळगडावर चाँद इमारत व पुढील बुरूज परीसरात गट नं१०८२(४९ब) परीसरात ऐंशी एकर जमिन आहे.तर पायथ्याशी १०८१ गटातील एक एकरात पार्कींग, हाँटेल, कोल्ड्रिंक्सची दुकाने थाटली आहेत.प्रत्यक्षात वीस मांडव दिसतात पण एकावन्न लोकांनी पायथ्याला जागा आरक्षित केल्याची माहिती माजी सरपंच संजय पाटील यांनी दिली.ग्रामपंचायतीने ही परवानगी कशी दिली यांचे आश्चर्य व्यक्त केले.
वनविभागाच्या कारवाई पथकात श्री गुरूप्रसाद यांचेसह पेंडाखळे विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी आर.एस.सुर्यवंशी,वनपाल एन.डी.नळवडे,एस.एस.खुपसे,श्रीमती आर.आर.शेळके सहभागी होते. गुरुवार असतानाही अतिक्रमण कारवाईमुळे गडावर शुकशुकाट पसरला होता.
प्रत्येक बातमी असेल हिताची…पाँझिटीव्ह वाँच नेहमीच आपल्या साेबत. एक सकारात्मक पाऊल