- *इंडिया म्युझिक फेस्टसाठी समृद्ध आर. के.याची रिसोर्स पर्सन म्हणून निवड*:
अलग अँगल् कम्युनीटी आर्ट सेंटर आणि बैठक नागपूर यांच्या संयुक्त विध्यमाने नागपूर येथे भारतीय संगीताविषयी आगळा वेगळा कार्यक्रम इंडिया म्युझिक फेस्ट दि. 14 जाने ते 15 जाने 2023 रोजी दोन दिवसीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी देशभरातील वेगवेगळ्या प्रांतातील तरुण कलावंत युवा संगीत क्षेत्रातील नवोदित कलाकार सहभागी होत आहेत.
त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी समृद्ध आर.के. (नेसरी) याची पश्चिम महाराष्ट्रातून नवोदित युवा संगीतकार,गायक,कंपोजर,संगीत निर्माता याची मार्गदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.
या महोत्सवात भारतातील वैविध्यपूर्ण शैलीतील वेगवेगळ्या धाटनीतील नवोदित गायक, वादक, संगीत संयोजक् कम्पोजर,गीत लेखक,अशा विविध कलाकारांचे दोन दिवस प्रत्यक्ष सादरीकरण,प्रात्य क्षिकासह मार्गदर्शन,व्याख्यान, चर्चासत्रातुन् शास्त्रीय संगीत.भारतीय संगीत आणि वाद्य,संगीत,संयोजन आदी बाबींविषयी खुले चर्चासत्र संपन्न होत आहे या कार्यक्रमात् देशभरातील संगीत प्रेमीना खूप मोठी संगीत मेजवांनी मिळणार आहे.
या महोत्सवात समृद्धची तज्ञ,मार्गदर्शक म्हणून निवड झाली आहे. त्यामध्ये तो शास्त्रीय संगीत आणि भारतीय संगीत,आणि वाद्य संगीत निर्मिती,आदी विषयी, तो प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणार आहे. अगदी लहान वयात त्याच्या संगीत कार्याची दखल संस्थेने घेऊन त्याला तज्ञ मार्गदर्शक म्हणून निवडलेबद्दल त्याचे विशेष कौतुक होत आहे.
समुद्ध गेली 15 वर्ष गडहिंग्लज येथे प्राचार्य
मच्छिन्द्र बुवा यांच्याकडे गुरुकुल पद्दतीने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत असून सद्या मुंबई विद्यापीठात बी.म्युझिकच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. त्याने देश विदेशातील अनेक कलाकारांसोबत संगीत,गायन आणि कम्पोजिंग ,संगीत विषयी कार्य केलेले आहे. तसेंच विविध टीव्ही मालिका,नाटक.वेब सिरीजची संगीत.कंम्पोजर,संगीत,रेकॉर्डिंग ,म्युझिकची कामे आपल्या स्वतःच्या स्टुडिओत मुंबईत करत आहे.
त्याच्या या संगीत कार्याबद्दल युवा संगीतरत्न पुरस्कार 2019 ला मिळाला आहे, तर मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबईचा राज्यस्तरीय आदर्श युथ महाराष्ट्र युथ आयडॉल कलारत्न हा सन्मान 2022 ला संगीत कार्याच्या योगदानाबद्दल प्राप्त झाला आहे.तर दुबई येथील सांस्कृतिक महोत्सवात 2013 ला शास्त्रीय संगीत स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. तर त्याने अलीकडेच गायन विशारद पूर्ण प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे.
सद्या विविध मालिका, वेब सिरीजचे संगीत संयोजन, बॅगराउंड मुझ्यिकची काम करत आहे.
त्याला स्वरसाधना गड, मुबंई विद्यापीठातील संगीत विभागाचे प्रमुख सर्व प्राद्यापक, आणि पालक प्रा.डॉ. आर.डी. कांबळे यांचे प्रोत्साहन लाभले.
या निवडीबद्दल स्वरसाधना संगीत महाविद्यालय गडहिंग्लज व मुंबई विद्यापीठातील संगीत विभागाने त्याचे विशेष अभिनंदन आणि कौतुक केले. तो दि.13 जानेला या महोत्सवात मार्गदर्शन करण्यासाठी जात असल्याबद्दल त्याला शुभेच्छा देण्यात आल्या.