पक्षाचा विचार प्रत्येक घरी पोहोचवून समाजहितासाठी काम करा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

राधानगरी तालुक्यातील शिवसेनेच्या विविध पदांवरील नियुक्त्या जाहीर

राधानगरी प्रतिनिधी – आजचा कार्यक्रम हा फक्त प्रवेशाचा किंवा औपचारिक कार्यक्रमाचा क्षण नाही, तर समाजहितासाठी नवे वचन देण्याचा क्षण आहे. शिवसेना हा केवळ सत्तेसाठीचा पक्ष नाही, तो समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविणारा पक्ष असून पक्षाचा विचार प्रत्येक घरी पोहोचवून समाजहितासाठी काम करा असे आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. ते राधानगरी तालुक्यातील शिवसेनेच्या विविध पदांवरील नियुक्त्यांच्या नियुक्तपत्र वाटप कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, या निवडींमुळे राधानगरी तालुक्यातील शिवसेना संघटनेला नवीन बळ प्राप्त झाले असून सर्व पदाधिकारी आगामी काळात शिवसेनेची विचारधारा, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण व उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांचे जनतेसाठीचे कार्य घराघरांत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध राहतील. यावेळी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील सर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय बलुगडे आदींनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील सर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय बलुगडे, अरुणराव जाधव, शरद सुतगिरण व्हा.चेअरमन अशोकराव फराकटे, शिवसेना तालुकाप्रमुख तानाजीराव चौगले, मानसिंग पाटील, राजू वाडेकर, अशोक वारके, सचिन वारके, राजेश मोरे, दिपक शेट्टी, आबा पाटील, एकनाथ चौगुले, दिपक पाटील, ठिकपुर्ली सरपंच प्रल्हाद पाटील, डी.पी.पाटील सर, माजी जि.प.सदस्या वंदनाताई जाधव यांच्यासह प्रमुख मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

यामध्ये प्रमुख निवडी पुढील प्रमाणे – :
शिवसेना शेतकरी सेना कोल्हापूर जिल्हा समन्वयक – शांताराम बुगडे, घुडेवाडी
शिवसेना शेतकरी सेना राधानगरी तालुकाप्रमुख – रंगराव पाटील, कौलव
शिवसेना महिलाआघाडी तालुका प्रमुख – निर्मला पाटील, कसबा वाळवे
शिवसेना महिलाआघाडी राधानगरी शहर प्रमुख – रुपाली कामत, राधानगरी
युवासेना तालुकाप्रमुख – मयुर पोवार, राधानगरी

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.