विजय बकरे
वन्यजीव सप्ताह निमित्त मांजर खिंड ते राधानगरी वन्यजीव कार्यालय रॅली…
राधानगरी प्रतिनिधी – राधानगरी वन्यजीव अभयारण्य यांच्यावतीने वन्यजीव सप्ताह निमित्त मांजर खिंड ते राधानगरी वन्यजीव कार्यालया पर्यंत झाडे लावा झाडे जगवा अशा घोषणा देत रॅली काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते अनिल बडदारे यांच्या हस्ते करण्यात आले.
![]() |
![]() |
यावेळी वन्यजीव चे कर्मचारी या रॅली मध्ये सहभाग घेऊन रॅली राधानगरी शहरातून झाडे लावा झाडे जगवा, माकडा हूप हूप, झाडे लावा खूप खूप अशा घोषणेने राधानगरी शहर घोषणाने दुमदुमन गेले. ही रॅली वन्यजीव कार्यालय राधानगरी येथे नेण्यात आली. या रॅली मध्ये वन्यजीव चे वनक्षेत्रपाल सुहास पाटील व कार्यालयातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.















































