पुन्हा एकदा पोर्नोग्राफीचा मुद्दा समोर…AI अॅप्सवर तातडीने नियंत्रण यावे-डॉ.नीलम गोऱ्हे यांना ‘माई’ चे निवेदन

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

बदनामी आणि चारित्र्यहनन यासाठी या ए आय अॅप्स चा गैरवापर होऊ शकतो!

जगभरात व भारतातही AIचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे.  एका रिपोर्टनुसार, AIचा भयावह चेहरा समोर आला आहे.अनेक जण AIचा वापर महिलांविरोधात करताना दिसत आहे. महिलांचे फोटो वापरुन त्यांचा गैरवापर  मोठ्या प्रमाणात  केला जात आहे.निर्वस्त्र आणि न्यूडिफाय सर्व्हिसच्या मार्केटिंगसाठी काही कंपन्या लोकप्रिय सोशल नेटवर्क साइटचा वापर करत आहेत.संशोधनानुसार, ट्विटर आणि रेडिटसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मार्केटिंगमध्ये 2400 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. कोणताही फोटो निर्वस्त्र करण्यासाठी AIचा वापर केला जात आहे. या साइट्स जास्तकरुन महिलांविरोधातच काम करत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पोर्नोग्राफीचा मुद्दा समोर आला आहे. तरी शासनाने याची गांभिर्याने दखल घेत, याचे भविष्यात हाेणारे दुष्परिणाम राेखावे, यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स   म्हणजेच AI अॅप्सवर तातडीने नियंत्रण यावे म्हणून उचित कारवाई साठी सहकार्य करणेबाबत!   मिडीया असोशिएशन आँफ इंडियाच्यावतीने संस्थापक अध्यक्ष शितर करदेकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. नीलमताई गोऱ्हे   उपसभापती, विधानपरिषद, महाराष्ट्र यांना निवेदन देण्यात आले.

AIच्या मदतीने हे फोटो विविध ठिकाणी पाठवण्यातही येत आहेत.सोशल मीडियावरुन महिलांचे फोटो विनापरवानगी वापरण्यात येत आहेत. तसेच या फोटोचा वापर करुन  सहमतीशिवाय व्हायरल करण्यात येत आहे.ग्राफिकाच्या अॅनालिस्ट रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, तुम्ही AIच्या मदतीने सगळंकाही क्रिएट करु शकता आणि विशेष म्हणजे हे सगळं काही खरं असल्यासारखं वाटतं. AIहे ओपन सोर्स आहे कोणीपण त्याचा वापर करु शकतं. अशा अॅप्सतर फ्रीमध्ये सर्व्हिस देतात. त्यामुळं कमी दिवसांतच या अॅप्सची लोकप्रियता खूप वाढली आहे. या अॅपच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचा अश्लील व्हिडिओ तयार करुन तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकण्यात येतो. हे अॅप्स AIच्या मदतीने कोणाचाही आपत्तीजनक व्हिडिओ बनवू शकतात. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, याचा वापर डिपफेक पॉर्नोग्राफीसाठी केला जातो. या रिपोर्टमधून एक धक्कादायक बाब समोर आलीय ती म्हणजे अधिकतर साईटवर महिलांविरोधात काम केले जात आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रतिबंधही केले जात नाही. डीप फेकने खळबळ उडविलेली असताना एखाद्या महिलेचे नग्न फोटो वापरून वाईट प्रवृत्तीचे लोक काहीही घडवून आणू शकतात, अशी भीती तज्ञांना वाटू लागली आहे.AI च्या मदतीने हे फोटो शेअर देखील केले जात आहेत. हे एवढे खतरनाक आहे की एखाद्या महिलेची बदनामी अगदी सहजरित्या केली जाऊ शकते. महिला व  पुरूष लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या बदनामी आणि चारित्र्यहनन यासाठी या ए आय अॅप्स चा गैरवापर होऊ शकतो! आणि म्हणूनच यावर नियंत्रण येणे अत्यावश्यक आहे!

 

शीतल करदेकर 

संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष 

मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.