पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
नाशिक (प्रतिनिधी): राज्यातील पूरग्रस्त जनतेला स्थानिक सेवेकर्यांनी आवश्यक ती सर्व मदत तातडीने देऊन त्यांना धीर आणि दिलासा द्यावा, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करावा, त्याचप्रमाणे शासकीय यंत्रणेच्या मदतीने पूरग्रस्तांचे लवकरात लवकर पुनर्वसन कसे होईल या दृष्टीने प्रयत्न करावेत असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांनी सेवेकरी परिवाराला उद्देशून केले.
गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांचे आवाहन
सेवामार्गातर्फे नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना नेहमीच मदत केली जाते. याच मानवतावादी भूमिकेतून परमपूज्य गुरुमाऊलींनी सेवेकऱ्यांना पूरग्रस्त, संकटग्रस्त आणि आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले आहे. प्रधान सेवा केंद्र दिंडोरी येथून जारी केलेल्या निवेदनात गुरुमाऊली श्री मोरे यांनी म्हटले आहे की, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मराठवाड्यासह काही जिल्ह्यात प्रचंड वित्तहानी आणि जीवित हानी झाली. शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाला. उभी पिके आडवी झाली आणि हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. पशुधन वाहून गेले.हजारो लोकांचे संसार उघड्यावर पडले.सध्या पाऊस थांबला असला तरी काही ठिकाणी पूर परिस्थिती कायम आहे.
अशा कठीण काळात सेवामार्गातर्फे पूरबाधितांना सेवामार्ग आणि सेवेकऱ्यांकडून आवश्यक ते सर्व गृहोपयोगी आणि संसारोपयोगी वस्तूंचे वाटप केले जात आहे. काही केंद्रांमध्ये मदत संकलित केली जात आहे. सर्वच सेवाकेंद्रातील सेवेकर्यांनी बालसंस्कार आणि युवा प्रबोधन विभागाने नियोजन केलेल्या पंचसूत्री कार्यक्रमानुसार मदत गोळा करून गरजवंतापर्यंत ताबडतोब पोहोचवावी. या आपत्तीत शेतकऱ्यांना धीर, दिलासा देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करावा. ही माणुसकीचे संस्कृती जोपासावी अशी आज्ञा गुरुमाऊलींनी सेवेकरी परिवाराला केली.
प्रत्येक जिल्ह्याने जबाबदारी घ्यावी..
प्रत्येक जिल्ह्यातील सेवेकर्यांनी मदत संकलित करून आपत्तीग्रस्तांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी स्वीकारावी, अन्न, वस्त्र, औषधे, किराणा सामान अशा स्वरूपात मदत देऊन रोगराई निर्माण होणार नाही याकरिता स्वच्छता अभियान राबवावे. अठरा विभागात काम करणाऱ्या सर्वच सेवेकर्यांनी संकटात सापडलेल्या आपल्या बांधवांसाठी ही माणुसकीची सेवा अग्रक्रमाने करावी अशी स्पष्ट सूचना गुरुमाऊलींनी केली.
संकट निवारणासाठी आध्यात्मिक सेवा..
आलेले संकट निवारण्यासाठी सेवेकर्यांनी जास्तीत जास्त आध्यात्मिक सेवा रुजू करावी असे सांगताना गुरुमाऊलींनी वादळ शमन ध्वज, भूकंप शांती यंत्र,ग्रामदैवत आणि नद्या समुद्र यांचा मानसन्मान त्याचप्रमाणे अब्जचंडीच्या सेवेत सहभागी होण्याचे तसेच भारत मातेला अस्मानी आणि सुलतानी संकट नाहीसे करण्यासाठी प्रार्थना करावी असे आदेश दिले.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.