विक्रमनगर येथील मोकळ्या जागेबाबत निर्णय घेऊ – प्रकाश आबिटकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विक्रम नगर कोल्हापूर येथील स्थानिक नागरिकांशी संवाद

कोल्हापूर – शहरातील विक्रमनगर येथील आय आर बी इमारतीच्या समोरील मोकळ्या जागेबाबत तेथील स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी क्रीडांगणासाठी जागा राखीव ठेवावी अशी मागणी केल्यानंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी याबाबत महापालिका स्तरावर बैठक घेऊन निर्णय घेऊ असे सांगितले. त्या ठिकाणी 12 हजार 900 स्क्वेअर मीटर मोकळी जागा असून या ठिकाणी क्रीडांगण झाल्यास स्थानिक तरुणांना त्याचा फायदा होईल अशी मागणी करण्यात आली होती. या भेटी वेळी महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रशीद बारगीर, शहर अभियंता रमेश मस्कर यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विक्रमनगर येथील आयआरबी इमारती समोरील जागा महापालिकेकडून यापूर्वीच आयटी पार्क साठी राखीव करण्यात आली आहे. त्या जागेचे रिझर्वेशन बदलून क्रीडांगणासाठी करण्यात यावे अशी मागणी स्थानिकांनी केली. याचबरोबर या भेटीवेळी विक्रम नगर येथील विविध विषयांवर पालकमंत्री आबिटकर यांच्याशी चर्चा झाली. भेटीवेळी मान्यवरांचे स्वागत माजी नगरसेवक रशीद बारगीर यांनी केले.

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.