जीवघेणी पावलांना वेळीच घालूया आळा
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस विशेष
जगभरातील वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सुसाईड प्रिवेंशन ही संस्था दरवर्षी 10 सप्टेंबरला जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून साजरी करते. यामागचा मूळ उद्देश समाजात संवाद स्थापन करून आत्महत्येविरोधात जागरुकता निर्माण करने हा आहे. याच धर्तीवर जागतिक आरोग्य संघटनेने ही 2021 ते 2023 या वर्षासाठी कृतीद्वारे सर्जनशील आशा (creative hope through action) नावाची मोहीम सुरू केली आहे.

भारत सरकारने ही आत्महत्येचा मृत्यूदरात 2030 पर्यंत 10 टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधात्मक मोहीम सुरू केली आहे.आत्महत्या प्रतिबंधात्मकबाबतीत देशातील ही पहिलीच मोहीम आहे. सध्या राजस्थानातील कोटा आत्महत्यांविषयी देशभरात चर्चेत आहे.जेईई आणि नीट परीक्षांसाठी देशभरात प्रसिद्ध असणारे हे शहर, उलाढाल 5000 कोटींच्या घरात. मात्र शैक्षणिक परीक्षांच्या ताण-तणावातून याच वर्षात 23 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याने चर्चत आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्डच्या अहवालानुसार देशात प्रत्येक दिवशी जवळपास 36 विद्यार्थी आत्महत्या करत आहेत.
जगभरात दरवर्षी आठ लाखांहून अधिक लोक आत्महत्या करत असल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल सांगतो.आत्महत्येबाबतच्या जागतिक यादीत भारत ही 37 व्या क्रमांकावर आहे. देशात सन 2021 ते 2022 च्या दरम्यान एक लाख 64 हजार 33 लोकांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. 2020 च्या तुलनेत आत्महत्येचा दर 6.2 टक्क्यांनी वाढला आहे. तर डिप्रेशन रेट 3.69 टक्के आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत आत्महत्येच्याबाबतीत महाराष्ट्र प्रथम स्थानी आहे.
- या आकडेवारीनुसार भारतासह जगभरात ही आत्महत्या एक जागतिक समस्या बनत चालली आहे. या आव्हानोकडे समाजातील सर्व घटकांनी आता गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. व्यक्ती, कुटुंब, समाजात सुसंवाद हवा. कठिन प्रसंगी, अडचणी व आव्हानांना सामोरे जाण्याचे कौशल्ये आत्मसात केले पाहिजे.
- आत्महत्येविषयी मनमोकळेपणाने संवाद साधायला हवा, ताण-तणावाप्रसंगी निसंकोचपणे मानसशास्त्रीय समुपदेशकाचा सल्ला घ्यायला हवा,हिरिरीने सामाजिक उपक्रमात भाग घेणे ही तितकेच महत्वाचे आहे. याच बरोबर सामाजिक-राजकीय संस्था आणि सरकारी पातळीवर आत्महत्या रोखण्यासाठी ठोस कृतिशील कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे. तरच भारताचे भविष्य असणा-या विद्यार्थी व तरूणांच्या जीवघेणी पावलांना वेळीच आळा घालून त्यांच्याकडून रचनात्मक,विधायक कार्ये घडवून घेवू शकतो.
**आत्महत्येची लक्षणे **– ताण-तणाव, नकारात्मक विचार, सतत चिंता व अनामिक भय, अल्प आहार, अपूरी झोप, मादक पदार्थ व ड्रग्सचे सेवन, मित्र-समाजापासून लांब राहणे, कमी बोलणे-विचारमग्न असणे, दबावाखाली जगणे, मनस्थितीत तीव्र बदल, आत्महत्याबाबत सतत विचार येणे, स्वतःला इजा करण्याच्या उद्देशाने विविध मार्ग शोधणे (जसे इंटरनेटवर मृत्यूसंबंधी माहिती शोधणे, विविध औषधांचा साठा करणे इ.) ![]()
![]()
आत्महत्येची कारणे- कौटुंबिक कारणे आणि आजारपण 33.6%
हा लेख खूप वाचला गेला..भारत… आंतरराष्ट्रीय पातळीवर इतकं महत्त्व का? वाचा सविस्तर-जी 20 |