…मतदानावर बहिष्कार ! हळदीमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

प्रतिनिधी -अरविंद सावरतकर

हळदी: कागल तालुक्यातील ग्रामस्थ मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलनाच्या तयारीत आहेत. यालाच पाठबळ देण्यासाठी कागल तालुक्यातील हळदी गावात राजकीय नेत्यांना गावबंदी केली व मराठा आरक्षण दिले नाही तर सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फलक लावून मराठा समाज आरक्षण दिले नाही तर इथून पुढील सर्व निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकला जाईल, असा सामूहिक निर्णय घेतलेला आहे. यावेळी अरुण मगदूम संतोष पोवार व अरविंद सावरतकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही महिन्यापासून तीव्र आंदोलने झाली.  आज देखील उपोषणे चालू आहेत .त्यांनाच पाठबळ देण्यासाठी हळदी ग्रामस्थांनी हा निर्णय घेतलेला आहे. वेळ पडली तर कठोर पावले उचलण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. असे मनोगत व्यक्त केले आहे.

यावेळी उत्तम व्हराबळे, मारुती वाडकर चतुर व्हणाले, पवन पाटील, प्रशांत लुल्ले, विकास माने व ग्रामस्थ तसेच हळदी मधील सकल मराठा समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.