पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
धामणी तिरावर दरवर्षी ग्रामस्थांची शिव्यांची बरसात
गवशी, सावतवाडीची प्राचीन परंपरा
**राधानगरी, विजय बकरे**
एकवीसावे शतक सुरु होवुन दोन दशके झाली. तरीही असंख्य गावात, संस्कृती, परंपरा, रुढी कटाक्षाने पाळल्या जाताहेत. विविध गावांच्या रितीरिवाज वेगवेगळ्या असतात. त्याची चर्चाही दूरवर पसरलेली असते. ती परंपरा जपण्याचे काम आजही गावागावात इमानेइतबार केली जाते.. आधुनिकतेच्या दुनियेत ही प्रथा जपण्याचे प्रामाणिक कार्य गावाेगावी गेले जात आहे. अशीच एक परंपरा आजही वर्षानुवर्षे जपलीय.
आधुनिक जगात कितीही क्रांती झाली तरी. काळानुरूप काही रुढी परंपरा आजही आपले अस्तित्व टिकवुन आहेत. राधानगरी तालुक्यातील धामणी खोऱ्यात गवशी व सावतवाडी या धामणी नदीच्या अल्याड-पल्याड सलोख्याने राहणार्या गावांदरम्यान वर्षातील एक तासापुरता होणारा ‘वाद’ येथील मातीत रुजलेल्या रुढीतील जिवंतपणा दाखवून जातो. हा वाद दरवर्षी गौरी गणपती विसर्जनाच्या दिवशी होतो. ही दोन्हीही गावे पै-पाहुण्यांचे माहेरघर. अगदी सामंजस्य संबंध प्रस्थापित झालेली त्यातून सलोख्याची भावना. या गावातील ग्रामस्थांचा ना बांधाला बांध तर ,ना मनात एकमेकांविषयी आकसाची भावना, तरीही मग यांच्यात वर्षातील एक दिवस परिसिमेचा झगडा होतो. एकमेकांना हातवारे करुन शिव्यांची लाखोली वाहिली जाते. विशेषतः यात स्त्रियांचा जास्त सहभाग असतो. तास दोन तासाच्या वादानंतर हा वाद कोणी मध्यस्थी न करता शमला जातो.
गवशीचे ग्रामदैवत भैरवनाथ तर सावतवाडीचे, ज्योतिर्लिंग येथे असणाऱ्या विठ्ठलाईला ग्रामदैवताचाच मान आहे. अशी एक दंतकथा आहे की, भैरवनाथ व विठ्ठलाई हे दोघे बहिणभाऊ नदीच्या ऐलपैल तीरावर वसलेल्या गावांत या दोघा बहीण भावांमध्ये एक दिवस वाद झाला होता.
आता बहिण भावातील वाद हा दोघांमधल्या घट्ट प्रेमाची, नात्याची अनुभुती असते. येथेही या दोन दैवतांच्या वादाला बहीण भावांच्या नात्यातील हट्टाची, आपुलकीची आणि निरागसतेची किनार होती असे बोलले जाते आणि हाच त्या दोन दैवतांमधील वाद येथील धार्मिकतेतुन व श्रद्धेतून लोक घडवून आणतात.
गौरी गणपती विसर्जनाच्या निमित्ताने लोक नदीच्या दोन्ही तीरांवर येतात. गौरी गणपतीचे विसर्जन होते व या वादाला तोंड फुटते. एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहिली जाते.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.