सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांच्या हस्ते सत्कार
कोल्हापूर – महाराष्ट्र शासनातर्फे सांगली जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ (माथाडी बोर्ड) त्रिसदसीए समितीवर सदस्यपदी (मालक प्रतिनिधी) सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक माननीय श्री विक्रम (दादा) बाळासाहेब वाघमोडे यांची निवड झाल्याबद्दल सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांच्या हस्ते त्यांच्या शाल श्रीफळ गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळेला इलाही बारूद वाले, एम के कोळेकर, अनमोल पाटील, खुदबुद्दीन मुजावर व अनेक जण उपस्थित राहून त्यांना भविष्यकाळासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या यावेळेला प्रवक्ते माननीय संतोष पाटील म्हणाले की आमचे मित्र माननीय विक्रम दादा वाघमोडे यांची निवड झाल्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे व ती मिळालेल्या संधीचं सोनं करतील. सांगली जिल्ह्यात वसंतदादा मार्केट यार्ड या ठिकाणी माथाडी बोर्ड असून त्या ठिकाणी असणाऱ्या हजारो माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवले जातील व माननीय विक्रम दादा यांची त्यांना भविष्यकाळात मदत होईल आणि त्यांचे प्रश्न सोडवले जातील त्याबद्दल त्यांना भविष्यकाळासाठी आपण शुभेच्छा देऊया असे मनोगत व्यक्त केले.

















































