‘महा निष्ठा महा न्याय यात्रे’च्या माध्यमातून विक्रोळी आणि मानखुर्द शाखा भेट दौरा…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याचे पैसे इलेक्ट्रोल बॉण्डप्रमाणे भाजपाच्या खात्यात आले का? आदित्य ठाकरेंचा सवाल…

मुंबई – शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचा संपूर्ण राज्यभरात झंजावात सुरू आहे. आज ‘महा निष्ठा महा न्याय’ यात्रेचं ईशान्य मुंबईत विक्रोळी येथे आयोजित करण्यात आला होतं. यावेळी हजारो शिवसैनिक, आणि सामान्य नागरिकांनी सभेत सहभाग नोंदवला होता. यावेळी बोलताना उपस्थित गर्दी पाहून ‘ही उपस्थित जनता पाहून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील भाऊ यांना १००% दिल्लीला पाठवणार हे निश्चित झालय’ असं आदित्य ठाकरे म्हणाले.

यावेळी सभेत उपस्थितांना संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले की ‘आज देखील मुंबईमध्ये भाजपने दोन सोडून उमेदवारी घोषित केले नाहीत, उद्धव साहेब भाजप बरोबर होते तेव्हा निश्चित होतं. भाजपला प्रचार करण्याची गरज वाटत नव्हती.आज जळगाव मधले त्यांचे सीटिंग उमेदवार भाजप सोडून शिवसेनेत आले, आणि त्यांनी पण हेच सांगितलं की ही लढाई आता काही राजकीय पक्षांची राहिली नाहीये, ही लढाई महाराष्ट्र हित आणि देश हिताची झालेली आहे.

आपल्यातले 40 गद्दार ईडी पासून संरक्षणासाठी भाजपला शरण गेले. केंद्र सरकाच्या हुकूमशाही वर्तणुकीवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की ‘2014 ते 24 पर्यंत 25 नेत्यांवर ईडीच्या धाडी पडल्या, 23 नेत्यांनी भाजपामध्ये उडी मारली. त्यांना भाजपच्या वॉशिंग मशीन ने जीवनदान दिले. आपल्यातले 40 गद्दार ईडी पासून संरक्षण मिळण्यासाठी भाजपला शरण गेले. 2022 मध्ये शिवसेना फोडली, 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, 2024 मध्ये काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न केला. तरीही अजूनही त्यांना उमेदवार मिळत नाही येत आणि आपले वाघ दिल्लीच्या दिशेने आता तयारी करताहेत आणि हे सगळे वाघ माझ्यासोबत आणि तुम्ही माझ्यासोबत आहात’.

स्ट्रीट फर्निचर टेंडर रद्द झाल आणि घोटाळा संदर्भात कारवाई झाली असं इथल्या उमेदवारान विधानसभेत खोटं सांगितलं. पण स्ट्रीट फर्निचर टेंडर रद्द झालेलं नाहीये. हा घोटाळयांचा जो पैसा तो इलेक्टोरल बॉण्डचा घोटाळे प्रमाणे पैसा कदाचित भाजप खात्यात गेलाय का. हे जे उमेदवार आहेत तुमच्या समोर उभे राहिलेले आहेत त्यांनी अधिवेशनात खोटं बोललेत आणि उद्या कदाचित जिंकून आल्यानंतर जिंकणार तर नाहीच पण जिंकले चुकून तर जनतेशी खोटं बोलतील असे खोटारडे उमेदवार तुम्हाला चालणार का? म्हणून आज तुम्हाला संजय भाऊंना निवडून द्यायचं आहे.

जनतेला संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र द्वेष्ट्या भाजपचा समाचार घेतला. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले ‘बिलकीस बानोच्या बलात्काऱ्याना वाचवण्यासाठी प्रयत्न करणारा आमचा धर्म नाही, देशात महिला असुरक्षित आहेत, आणि तरुणांना रोजगार नाही, अशी भयानक स्थिती आहे, महाराष्ट्राचा द्वेष केला जातोय, उद्योग पळवले जातायत, त्यामुळे अश्या महाराष्ट्र द्रोही भाजपाला मतदान करणार का?’ असा मतदारांना सवाल आदित्य ठाकरेंनी केला.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.