विद्या मंदीर, घोटवडे शाळेचे फ्युच्युरिस्टीक क्लासरूम बांधणेसाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर – प्रकाश आबिटकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

जिल्हा नियोजनमधून नाविण्यपुर्ण योजेनअंतर्गत निधी मंजूरी…

कौलव वार्ताहर – जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं की तुमच्या नजरेसमोर काय चित्र उभं राहतं याची कल्पना आम्हाला आहे. पण आता जिल्हा परिषदेच्या शाळांचे चित्र बदलतं आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा केवळ डिजिटलच होत नाहीत तर त्यात अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना राबवल्या जात आहेत. अशीच ‘फ्युचरीस्टिक क्लास रुमची संकल्पना विद्या मंदीर घोटवडे शाळेत राबवली जात असून त्याकरीता 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दपत्रकाव्दारे दिली आहे.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, शिक्षणक्षेत्रात तंत्रज्ञानाचा आटोकाट अवलंब होणे काळाची गरज आहे. शिक्षणक्रांतीमुळे केवळ पाच वर्षात देश महासत्ता बनेल. ग्रामपंचायत सरपंच धिरज डोंगळे, ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष अमर डोंगळे यांच्यासह सर्व सदस्य यांच्या मागणीनुसार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहकार्याने घोटवडे गावात उच्च तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणप्रणाली कार्यान्वित झाली. ही बाब अभिमानास्पद असून येथिल मुले अद्ययावत शिक्षण घेऊन जगाला आव्हान द्यायला सज्ज होतील अशा विश्वास आमदार आबिटकर यांनी व्यक्त केला आहे.

टचस्क्रीन मॉनीटर प्रत्येक मुलापुढे बेंचवर टचस्क्रीन मॉनिटर असून मुले त्यावर सगळा अभ्यास करतात. त्यांनी केलेला अभ्यास अर्थात वर्गपाठ त्यांना सेव्ह करून ठेवण्याची सोय देखील झाली आहे. अशी शाळा एका तालुक्याच्या ठिकाणी असणे आणि अतिशय नेटाने विद्यार्थ्यांना भविष्यातील शिक्षण देत राहणे कौतुकास पात्र ठरू नये तर नवल.

फ्युचरिस्टिक डिजिटल क्लासरूमची वैशिष्ट्ये – ३० विद्यार्थी क्षमतेची फ्युचरिस्टिक डिजिटल क्लासरुम. ‘ट्रान्सफॉर्मशेन ऑफ टेक्नोलॉजी इन टू एज्युकेशन’ या संकल्पनेवर आधारित अभ्यासक्रम. ‘टेक्नॉलॉजी एनहान्सड् लर्निग’ संकल्पना. मुलांच्या डिजीटल शिक्षण प्रगतीचे ऑनलाईन मॉनटरींग. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या अॅक्टीव्हीटीचे डिजीटल पध्दतीने नियंत्रण. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण आता जिल्हा परिषदेच्या शाळेत मिळणार आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.