महावितरणच्या विविध कामांचे पालकमंत्री यांच्या हस्ते उद्या दि.19 मार्च रोजी लोकार्पण

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून १२४ कोटींची कामे पूर्ण… राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील वीज ग्राहकांना मिळणार अधिक दर्जेदार सेवा

कोल्हापूर (विनायक जितकर) – महावितरणने वीज ग्राहकांच्या सेवा अधिक दर्जेदार करण्याच्या दृष्टीने गारगोटी, राधानगरी व आजरा उपविभागात १२४ कोटींची विविध कामे केली आहेत. या कामांचे लोकार्पण सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्या (दि. 19 मार्च) रोजी करण्यात येत आहे. तांबाळे (ता.भुदरगड), कसबा वाळवा व धामोड (ता. राधानगरी) या तीन ठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत. 

राज्य शासनाकडून नागरिकांचे जीवनमान उंचावण्याकरिता विविध योजना राबवण्यात येत असतात. सध्या महावितरणकडून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०, आरडीएसएस योजना, कृषी धोरण योजना, नवीन वीज जोडणी योजना, कृषी आकस्मिक निधी योजना आदी योजना राबवण्यात येत आहेत. या विविध योजनांतून महावितरणने भुदरगड , आजरा व राधानगरी तालुक्यात अनेक कामे केली आहेत. यामध्ये प्रामुख्याने ७७ कोटींचे २२ मेगावॉटचे सौर ऊर्जा प्रकल्प उभा करणे, कसबा वाळवा (१०एमव्हीए) व गवसे-हरपवडे (५ एमव्हीए) येथे ७ कोटींचे नवीन रोहित्र उभा करणे, १४.२ कोटींचे काम करून विविध आठ ठिकाणांच्या उपकेंद्रांच्या रोहीत्रांची क्षमता वाढ करणे व अतिरिक्त रोहित्र उभा करणे यांचा समावेश होतो. 

याच बरोबर नागरिकांच्या विद्युत सुरक्षिततेची काळजी घेण्याच्या दृष्टीने सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना व विशेष घटक योजनेतून ९.१८ कोटी खर्च करून ३६४ ठिकाणी विद्युत वाहिन्यांचे स्थलांतर करणे, नवीन वीज जोडणी योजनेतून ९.३५ कोटी खर्च करून ७६४ नवीन वीज ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आल्या आहेत. तसेच विद्युत अपघात टाळण्याच्या दृष्टीने ३.५१ कोटी खर्च करून स्पेसर्स बसवणे, वितरण पेट्या बसवणे, गंजलेले पोल व तारा बदलणे आदी कामे करण्यात आली आहेत. कृषी आकस्मिक निधी योजनेतून ४.८० कोटी खर्च करून मासेवाडी (ता.आजरा) येथे ५ एमव्हीए क्षमतेचे नवीन उपकेंद्र उभा करण्यात आले आहे. या कामांमुळे राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील वीज ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा मिळणार आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.