जीएसटीमुळे देशाच्या कर संकलनात चांगली वाढ
देशभरात पायाभूत सुविधांची वेगवान उभारणी, लवकरच पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावे,
खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत भुमिका
वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीमुळे देशाच्या कर संकलनात चांगली वाढ झाली आहे. कराच्या पैशातून संपूर्ण देशभरात पायाभूत सुविधांची उभारणी वेगाने होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसीत भारत संकल्पनेला झपाट्याने मुर्त स्वरूप येत आहे. जीएसटी कौन्सीलमुळे व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळणार असून, लवकरच पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावे, अशी अपेक्षा खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत बोलताना व्यक्त केली. २०१४ नंतर भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत असून, भ्रष्टाचाराला आळा बसत आहे. त्यामुळे विकसीत भारत संकल्पना देशाला एका वेगळ्या उंचीवर नेत असल्याचे खासदार महाडिक म्हणाले.
![]() |
![]() |
नवी दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात आज खासदार धनंजय महाडिक यांनी, एका महत्वाच्या विषयावर सविस्तर भुमिका मांडली. १३ डिसेंबर २०२३ ला लोकसभेत जीएसटी कायदा सुधारणा विधेयक मांडले गेले आहे. तर आज हे विधेयक चर्चेसाठी राज्यसभेत आले. त्याला खासदार धनंजय महाडिक यांनी पाठींबा दर्शवला. जीएसटी कौन्सील बनवण्यासाठी अशी सुधारणा आवश्यक असून, उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या ६ कोटी दावे, या कौन्सीलमुळे कमी होतील, असा आशावाद खासदार महाडिक यांनी बोलून दाखवला. विकसीत भारत संकल्पनेत जीएसटीचा महत्वाचा वाटा असून, कोव्हीड काळात राज्य सरकारच्या कर संकलनात घट झाली तरी, केंद्र सरकारने राज्यांना आर्थिक मदत दिल्याकडे खासदार महाडिक यांनी लक्ष वेधले.
![]() |
![]() |
![]() |
गेल्या महिन्यात जीएसटी मधून १ लाख ६७ हजार कोटी रूपयांचे केंद्र सरकारला उत्पन्न मिळाले. तर वर्षभरात २० लाख कोटी रूपयांचे संकलन होईल, अशी आशा आहे. त्यातून संपूर्ण देशात अनेक पायाभूत सुविधांची वेगाने उभारणी होत असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. १२ कोटी शेतकर्यांना अनुदान, ८० कोेटी जनतेला मोफत रेशनधान्य, आरोग्य यंत्रणेचे सक्षमीकरण, वंदेभारत आणि मेट्रो रेल्वेची सुरवात, विमानतळांची वेगाने उभारणी अशा अनेक कामांसाठी जीएसटी मधून गोळा होणार्या पैशाचा विनियोग होत असल्याचे खासदार महाडिक म्हणाले.
२०१४ नंतर मोदी सरकार केंद्रात आल्यावर अनेक स्टार्टअप कंपन्या वाढल्या, त्यातून रोजगार वाढले, लघु आणि मध्यम कंपन्या वाढल्या, डीमॅट खात्यांची संख्या वाढली. इंटरनेटचा वापर वाढला, विमान आणि हॉटेल व्यवसायाला वाढता प्रतिसाद मिळाला असे सांगून, ऑनलाईन आणि डिजीटल व्यवहारामुळे नागरिकांचा वेळ वाचला. शिवाय भ्रष्टाचाराला आळा बसला, असेही खासदार महाडिक यांनी नमुद केले. आता लवकरच पेट्रोल अणि डिझेल इंधन जीएसटीच्या कक्षेत आणावे, जेणेकरून इंधनाचे दर कमी होतील, अशी अपेक्षा खासदार धनंजय महाडिक यांनी बोलून दाखवली.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भारत सर्व क्षेत्रात वेगाने प्रगती करतोय. आज जागतिक स्तरावर भारत पाचवी आर्थिक महासत्ता आहे. लवकरच भारताची अर्थव्यवस्था तिसर्या स्थानी जाईल आणि विकसीत भारत संकल्पनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देश महासत्ता बनण्याचे स्वप्न पूर्ण होईल, अशी खात्री खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत बोलून दाखवली. त्याला अन्य सदस्यांनी बाके वाजवून पाठींबा दर्शवला.
![]() |