तीन दिवसीय परिषदेत देश-विदेशातील संशोधक व विद्यार्थ्यांनी सहभाग १२१ सहभागींपैकी ६ उत्कृष्ट पोस्टरची निवड
कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे ‘पायोनियर सायन्स ॲन्ड प्रोग्रेस नॅनोटेक्नॉलजी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (ICPSP-NSD 2025)’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसीप्लीनरी रिसर्चमधील पीएचडी संशोधक सुहासिनी जयवंत यादव व सुस्मिता सतीश पाटील यांना ‘बेस्ट पोस्टर अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.
या तीन दिवसीय परिषदेत देश-विदेशातील संशोधक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी नामवंत शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन त्याचबरोबर ओरल व पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा घेण्यात आली. १२१ सहभागींपैकी ६ उत्कृष्ट पोस्टरची निवड करण्यात आली. यामध्ये डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ठसा उमटवला. पद्मश्री डॉ. जी. डी. यादव, शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, श्रीम कंपनीचे चेअरमन शहाजी जगदाळे तसेच विविध विभागांचे प्रमुख व प्राध्यापकंच्या उपस्थित पुरस्कार वितरण झाले.
सुहासिनी यादव या डॉ. शरद पाटील तर सुस्मिता पाटील या डॉ. अर्पिता पांडे-तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी करत असून, रिसर्च डायरेक्टर प्रा. सी. डी. लोखंडे यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले आहे. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त व शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, रिसर्च डायरेक्टर प्रा. सी. डी. लोखंडे यांनी या विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.