21 ऑक्टोबरला पोलीस स्मृतीदिनी पोलीस हुतात्म्यांना श्रद्धांजली…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

स्मृती स्तंभावर पुष्पचक्र अर्पण करुन पोलीस हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार…

कोल्हापूर – जिल्हा पोलीस दलाच्या वतीने 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिनी सकाळी 7.30 वाजता पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, कसबा बावडा, कोल्हापूर येथे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृती स्तंभावर पुष्पचक्र अर्पण करुन पोलीस हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे.

देशातील सर्व पोलीस मुख्यालयांच्या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहण्यात येते. या दिवशी या कालावधीत कर्तव्य बजावित असताना वीरगती प्राप्त झालेल्या पोलीस व तत्सम दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात येते. दि. 20 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दोन जवान बेपत्ता झाल्याने त्यांचा शोध घेण्याकरिता आय.टी.बी.पी. आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 22 जवानांची एक तुकडी 21 ऑक्टोबर रोजी गेली होती.

या तुकडीवर “हॉट स्प्रिंग्ज या ठिकाणी चिनी सैनिकांनी अचानक शस्त्रानिशी जोरदार हल्ला चढविला. या हल्ल्यात शोध तुकडीतील 10 जवान मृत्युमुखी पडले. 5 जवान जखमी झाले तर 7 जवानांना चिनी सैनिकांनी ताब्यात घेतले, शत्रुशी निकराची लढत देताना या शुरवीरांनी देशासाठी आपले देह धारातिर्थी ठेवले. तेव्हापासून 21 ऑक्टोबर हा दिवस देशांतील विविध पोलीस दलाच्या वतीने “पोलीस स्मृती दिन” म्हणून पाळला जातो, असे ही पत्रकात नमुद केले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.