कोल्हापूरात अलिशान कारमधून देशी-विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक–दोघे अटकेत,९.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

“टोयोटा कार फक्त ट्रॅव्हलसाठीच वापरतात असं वाटतं? पण कोल्हापुरात एका टोयोटा ग्लांझामधून अवैध दारू वाहतुकीचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी धाडसी कारवाई करत दोन संशयितांना अटक केली असून तब्बल ₹९.१५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आणि क्राईम ब्रँचच्या स्मार्ट योजनेमुळे शक्य झाली.”

कोल्हापूर : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) आणि लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत दोन इसमांना देशी व विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक करताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून तब्बल ₹९,१५,५५० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये दारूसह टोयोटा ग्लांझा कारचा समावेश आहे.

गाडीतून दोघांना ताब्यात घेण्यात आले.पुरुषोत्तम जयप्रकाश राणे (४०),संदेश संदीप राणे (३३) – दोघेही रा. राणेवाडी बापर्डे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग.  त्यांच्याकडून ₹९३,३०० किंमतीची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली. याशिवाय टोयोटा कार, मोबाईल, इतर साहित्य असा एकूण ₹९,१५,५५० किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अवैध दारू व्यवसायाविरोधात प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत. LCB चे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तयार केलेल्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की सिंधुदुर्ग पासिंगची टोयोटा ग्लांझा (MH-07-AS-2267) कार माळकर तिकटी परिसरातून दारूची वाहतूक करणार आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व त्यांच्या पथकाने सापळा रचून कार ताब्यात घेतली.

कोल्हापुरातील वाईन शॉपचा तपासात उलगडा

तपासादरम्यान उघडकीस आले की, जप्त केलेली दारू कोल्हापुरातील रोहित वाईन्स, लक्ष्मीपुरी येथून आणण्यात आली होती. त्यामुळे आता पोलिसांनी या वाईन शॉपच्या कागदपत्रांचीही तपासणी सुरू केली आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली. पथकात पो.उ.नि. संतोष गळवे,अंमलदार योगेश गोसावी, गजानन गुरव, संतोष बरगे, परशुराम गुजरे, वैभव पाटील, अमित सर्जे, युवराज पाटील, विशाल खराडे, शिवानंद मठपती, प्रदिप पाटील, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील अबीद मुल्ला, संतोष कुंभार, प्रितम मिठारीअधिकारी व कर्मचारी सहभागी होते

ता. क. पाँझिटीव्ह वाँच-    काेल्हापुरात देशी-विदेशी दारूच्या अवैध व्यापाराची मालिका कायम सुरू असल्याचे या घटनेवरून पुन्हा स्पष्ट झाले आहे. टोयोटा सारख्या वाहनांचा वापर, आणि जिल्ह्याबाहेरून आलेले संशयित हे या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर असलेल्या नेटवर्कचे संकेत देतात.

आजच आपल्या हक्काची लक्झरीयस बस निवडा.. आरामदायी, आनंददायी प्रवास करा

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.