एचडीएफसी बँक परिवर्तनचा आतापर्यंत खेळांच्या माध्यमातून 5000 व्यक्तींवर प्रभाव

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

खेळाडूंना मदत आणि स्थानिक स्तरावर क्रीडा पायाभूत सुविधा मजबूत 

आसाम, हरियाणा, कर्नाटक, मणिपूर, मेघालय, नागालँड, सिक्कीम, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथे उपक्रम 

मुंबई: हॉकीचे दिग्गज मेजर ध्यानचंद यांच्या सन्मानार्थ साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त एचडीएफसी बँक परिवर्तन क्रीडा क्षेत्रात परिवर्तन, प्रेरणा आणि उन्नतीची शक्ती साजरी करत आहे. बँकेच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांतर्गत 38 महिला खेळाडूंना त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मदत केली जात आहे. त्याचबरोबर स्थानिक क्रीडा सुविधा सुधारल्या जात आहेत आणि अधिकाधिक तरुणांना खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. बँकेने आतापर्यंत खेळांच्या माध्यमातून 5000 हून अधिक व्यक्तींवर प्रभाव टाकला आहे.

खेळाडूंना अशी मदत –

एचडीएफसी बँकेने गोस्पोर्ट्स फाउंडेशनच्या सहकार्याने महिला खेळाडूंना सशक्त करण्यासाठी 2022 मध्ये अनस्टॉपेबल – करके दिखाऊंगी (यूकेडी) हा कार्यक्रम सुरू केला. या यूकेडी कार्यक्रमाने 2022 पासून आतापर्यंत सहा क्रीडा प्रकार –  वेटलिफ्टिंग, अॅथलेटिक्स, पोहणे, बॅडमिंटन, तिरंदाजी आणि टेबल टेनिस यामध्ये एकूण 38 महिला खेळाडूंना मदत केली आहे. या खेळाडूंनी मिळून उल्लेखनीय यश मिळवले असून आतापर्यंत 204 पदके जिंकली आहेत – त्यात 97 सुवर्ण, 56 रौप्य आणि 51 कांस्य पदकांचा समावेश आहे. यापैकी 36 पदके आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये जिंकली गेली आहेत, ज्यातून त्यांची जागतिक क्षमता दिसून आली आहे.प्रशिक्षण, क्रीडा विज्ञान शिक्षण, स्पर्धांचा अनुभव आणि आर्थिक मदत अशा सर्वसमावेशक सहाय्याद्वारे हा कार्यक्रम अडथळे दूर करून भारतीय क्रीडाक्षेत्रात महिला रोल मॉडेलची नवी पिढी घडवण्याचा प्रयत्न करत आहे.

तसेच, एचडीएफसी बँक फाउंडेशन फॉर प्रमोशन ऑफ स्पोर्ट्स अँड गेम्ससोबत काम करून भारतीय खेळाडूंना विविध प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य, इक्विपमेंट आणि क्रीडा विज्ञान यासारख्या विकास कार्यक्रमांद्वारे मदत करत आहे. या उपक्रमात ऑलिंपिक पदक जिंकण्याची क्षमता असलेले सिनियर तसेच ज्युनियर खेळाडू सामील आहेत ज्यामध्ये पॅरा- अ‍ॅथलीट्स ओळखण्यावर विशेष लक्ष दिले जात आहे.

खेळाच्या पायाभूत सुविधांचा विकास

खेळाडूंच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रयत्नांना पूरक म्हणून, एचडीएफसी बँक परिवर्तनने आसाम, हरियाणा, कर्नाटक, मणिपूर, मेघालय, नागालँड, सिक्कीम, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड यांसारख्या अनेक राज्यांत स्थानिक स्तरावर क्रीडा सुविधांमध्ये सुधारणा केल्या आहे. हा उपक्रम स्पोर्ट्स राईज प्रकल्पाचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश भारतभर क्रीडा पायाभूत सुविधा सुधारून शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करणे आहे.

याच वर्षी जून महिन्यात बँकेने प्लॅन इंटरनॅशनलच्या भागीदारीत उत्तर प्रदेशातील बागपत येथे नव्याने नूतनीकरण केलेल्या जिल्हा क्रीडा स्टेडियमचे उद्घाटन केले, ज्यामुळे 2,500 हून अधिक लोकांना फायदा झाला. या सुविधांमध्ये आता स्विमिंग पूल, इनडोअर कोर्ट, जॉगिंग ट्रॅक आणि सौरऊर्जेवर चालणारी प्रकाशयोजना उपलब्ध असून, स्थानिक समुदायाला खेळांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्याची संधी मिळत आहेत.

हरियाणामध्ये, बँकेने पंचकुला येथील ताऊ देवी लाल स्टेडियम आणि जिमखाना क्लबच्या नूतनीकरणासाठी मदत केली असून येथे आता 10-लेन शूटिंग रेंज, फेन्सिंग गियर, ऑब्स्टॅकल कोर्स आणि अत्याधुनिक स्विमिंग सुविधा उपलब्ध आहेत. तसेच कर्नाल मधील नीलोखेरी येथील पीएम श्री सरकारी गव्हर्नमेंट सिनिअर सेकंडरी स्कूलही नव्याने विकसित करण्यात आले आहे. येथे नवीन बॅडमिंटन आणि बास्केटबॉल कोर्ट, बॉक्सिंग रिंग, सौरऊर्जेवर चालणाऱ्या सुविधा आणि पूर्णपणे सुसज्ज क्रीडा संसाधन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.