आत्मनिर्भर भारत घडे, मविप्र ग्रामीण विद्यार्थी एआय ‘बाप’ संगे पुढे!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

१००% प्लेसमेटसाठी मविप्र क.का वाघ कॉलेजची इंडस्ट्रीयल व्हिझीट 

नाशिक:(किरणकुमार जोहरे)– एक ग्रामीण भागातील विद्यार्थी परदेशात जातो. अनुभव घेतो. मग आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी परत येतो. शहरात अनेक संधी असतानाही, अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील परेगाव खुर्द या दुर्गम गावात ‘द बाप कंपनी’ (The BAAP Company) उभी राहिली. ही कंपनी २४ बाय ७ कार्यरत आहे.

५०० पेक्षा जास्त मुलामुलींची ही कंपनी आज ग्रामीण भागातूनच जगस्तरीय सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करते. जगभर सेवा पुरवते. प्रत्येक जिल्ह्यात हेच शैक्षणिक सेल्फ सस्टेनेबल मॉडल राबविण्याचे ध्येय उराशी बाळगत.

द बाप कंपनीची स्थापना अमेरिका रिटर्न सीईओ रावसाहेब घुगे यांनी केली. अवघ्या ४ वर्षांत कंपनीने एआय, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, क्लाउड टेक्नॉलॉजी, फिनटेक, हेल्थटेक आणि डिजिटल इनोव्हेशन क्षेत्रात कमाल केली. आज शेतकऱ्यांच्या मुलांना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, क्लाउड टेक्नॉलॉजी, फिनटेक, हेल्थटेक आणि डिजिटल इनोव्हेशनने २५ हजार ते ५ लाख रुपये मासिक पगार मिळतो. ही रिअल लाइफ स्टोरी आहे – रिल लाइफ नाही!

सेल्फ-सस्टेनेबल मॉडेलने १०० टक्के प्लेसमेंट

मविप्र समाजाचे शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव व प्राचार्य प्रोफेसर डॉ. सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, मविप्रचे पिंपळगाव बसवंत येथील क.का वाघ महाविद्यालयातील संगणक शास्त्र विभागातील पदवी व पदवीत्तरचे ७५ विद्यार्थी आणि ५ प्राध्यापक यांनी ही रोमांचक सफर प्रत्यक्ष अनुभवली. संगणक शास्त्र विभागप्रमुख प्रा. मनीषा सोनावणे यांच्या नेतृत्वात ही औद्योगिक भेट आयोजित झाली. कंपनी १०० टक्के प्लेसमेंट देत आहे. त्यांच्या सेल्फ-सस्टेनेबल मॉडेलचा अभ्यास हा या भेटीचा मुख्य उद्देश होता.या उपक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांना नवे क्षितिज दाखवते.

मविप्रच्या क.का. महाविद्यालयातील १०० टक्के विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ग्रामीण महाराष्ट्रातूनही जागतिक स्तराचे यश शक्य आहे असे संगणक शास्त्र विभागप्रमुख प्रा. मनीषा सोनावणे यांनी सांगितले.

एआय गेम चेंजर फ्युचर

विद्यार्थ्यांनी कंपनीत प्रत्यक्ष वातावरण पाहिले. एआय गेम चेंजर फ्युचर आहे यामुळे एआय सारख्या नव्या तंत्रज्ञानाचे पैलू समजले. जागतिक करिअर संधी ओळखल्या. ग्रामीण भागातूनही जागतिक प्रोजेक्ट्स आणि नोकऱ्या शक्य आहेत, असा आत्मविश्वास निर्माण झाला. विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रश्न विचारले. कंपनीच्या सोर्स कोडवर स्वतः काम करण्याची संधी मिळाली. एआय व डिस्ट्रिब्युटेड इंजिनिअरिंग मॉडेलची माहिती घेतली. हा अनुभव ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अद्वितीय ठरला.

सॉफ्ट स्किल्स, व्यक्तिमत्त्व विकास, प्रॉब्लेम सॉल्वरची गरज

कंपनीच्या व्यवस्थापक सौ. पुनम नागरे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले, “आयटी क्षेत्रात फक्त तांत्रिक कौशल्ये पुरेशी नाहीत. सॉफ्ट स्किल्स, व्यक्तिमत्त्व विकास आणि समस्या सोडवण्याची क्षमता यांचाही मोठा वाटा आहे.” उद्योगातील आव्हाने आणि त्यावर मात करण्याच्या पद्धतीही स्पष्ट केल्या. या उपक्रमात प्रा. नरेंद्र बोरस्ते, प्रा. ज्योत्स्ना घुले, प्रा. सोनाली महाले आणि प्रा. माधुरी साबळे सहभागी झाले. उपक्रम यशस्वी होण्यासाठी विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.