संभाजी ब्रिगेड पक्षाकडून तीन दिवसाचा आढावा दौरा..

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

पक्षसंघटनेच्या कार्याचा सविस्तर अहवाल घेऊन पदाधिकाऱ्यांच्या समस्या, तक्रारी, प्रश्न सुचनावर लक्ष…

मुंबई – संभाजी ब्रिगेड पक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऍड. मनोज आखरे यांच्या दिलेल्या आदेशानुसार आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मुंबई मधील पक्षसंघटनेचा 15 ते 17 मार्च असा तीन दिवसाचा आढावा दौरा घोषित केला होता.

संभाजी ब्रिगेड पक्ष मुंबई कार्यकारिणी पदाधिकारी आणि सर्व जिल्हाध्यक्ष तसेच आघाडी प्रमुख कामगार, विद्यार्थी, महिला, चित्रपट, वाहतूक, फेरीवाले, यांच्या महत्त्वपूर्ण बैठकांमधून संभाजी ब्रिगेड पक्ष महाराष्ट्र कार्याध्यक्ष तथा मुंबई संपर्क प्रमुख सुधीरजी देशमुख (मामा) व सह-संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र सह-संघटक सुयोग औंधकर महाराष्ट्र, महाराष्ट्र सह-संघटक दिनेश महाडीक, संदीप बारड केन्द्रिय निरीक्षक कमेटीने दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर मुंबई जिल्हा तसेच कामगार आघाडी सह सर्व जिल्हा जनसंपर्क कार्यालयास भेट देऊन आढाव बैठका घेऊन मुंबई मधील पक्षसंघटनेच्या कार्याचा सविस्तर अहवाल घेऊन पदाधिकाऱ्यांच्या समस्या, तक्रारी, प्रश्न सुचना लक्षपूर्वक ऐकून घेतल्या त्यांचा सर्व शंकांचे निरसन करून उपस्थित पदाधिकाऱ्यांना संभाजी ब्रिगेड पक्षची भुमिका, धैय, धोरण आणि पुढील वाटचालीस महत्त्वपूर्ण असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी उत्तर मुंबई जिल्हामधील बोरीवली पुर्व सुकरवाडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अशोक गुप्ता यांनी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सुधीरमामा देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह संभाजी ब्रिगेड पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला.

यावेळेस संभाजी ब्रिगेड पक्ष मुंबई अध्यक्ष सुहास राणे यांच्यासह मुंबई विभागीय पदाधिकारी प्रमोद शिंदे, गणपत गावकर, श्रिकांत गिरी, शाहीद कुरेशी, संदेश धामणकर, ॲड.रिया करंजकर, सं. ब्रि.कामगार संघटना मुंबई अध्यक्ष राजेंद्र कांबळे, जिल्हाध्यक्ष काशीनाथ चोरगे, अनंत सावंत, प्रशांत मेढे तसेच शंकर निर्वाण, पुनम शिंदे, सं. ब्रि. विद्यार्थी आघाडी मुंबई अध्यक्ष यश सोनावळे, मेहुल नांद्रे, अथर्व शेलार यांनी आपआपल्या विभागातील दौऱ्यातील सर्व बैठकीचे नियोजन करण्यासाठी अपार मेहनत घेऊन वरील दौरा यशस्वीरीत्या पार पाडला.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.