अनोखं अभियान…कोल्हापुरात ‘श्री गणेशा आरोग्याचा 2025’

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कोल्हापुरात गणेशोत्सवात सुरू होतंय अनोखं अभियान – ‘श्री गणेशा आरोग्याचा 2025’

कोल्हापूर :
गणेशोत्सव म्हटलं की भक्ती, उत्साह, सजावट, आरास… पण यंदा कोल्हापूर जिल्हा एका वेगळ्या पाऊलखुणेसाठी सज्ज होतोय. कारण यंदा येथील सार्वजनिक मंडळांमधून सुरू होत आहे एक अनोखं अभियान – ‘श्री गणेशा आरोग्याचा 2025’.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांतून या उपक्रमाला सुरुवात होत आहे. गणेशोत्सवाला समाजोपयोगी रंग देण्याची ही कोल्हापुरच्या भूमीची परंपरा. आणि या परंपरेला नव्या उंचीवर नेणारं पाऊल म्हणजे हे आरोग्य अभियान.

 “जास्तीत जास्त मंडळांनी सहभागी व्हावं, हीच अपेक्षा आहे.”

 यातून वेगळी जनजागृती हाेईल.एक आगळा-वेगळा उपक्रम ठरेल.
डॉ. चंद्रकांत वासुदेव परुळेकर, कक्ष प्रमुख, कोल्हापूर

आजच्या धावपळीच्या जगण्यात लोक ‘आरोग्य हेच खरे धन’ विसरत चालले आहेत. मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार अशा आजारांचा धोका वाढतोय. त्यातूनच या अभियानाचा संदेश ठळक होतो – ‘सावध रहा, सुखी रहा. उपचारापेक्षा प्रतिबंध श्रेष्ठ!’

या दिवसांत जिल्ह्यात विविध उपक्रमांची रेलचेल होणार आहे – मोफत आरोग्य तपासण्या, रक्तदाब-शुगर-डोळे-दंत तपासणी, स्वच्छता मोहिमा, प्लास्टिकमुक्त गणेशोत्सवाची संकल्पना, तज्ज्ञ डॉक्टरांकडून आहारशास्त्र व मानसिक आरोग्यावर व्याख्याने, तसेच व्यसनमुक्तीचा संदेश देणारे कार्यक्रम. मंडपांमध्ये आणि चौकात आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या जाणीवा जागृत करणारे सजीव देखावे.

आणि त्यातही खास म्हणजे रक्तदान शिबिरे – कारण ‘रक्तदान हेच जीवनदान’ हा मंत्र या उत्सवात प्रत्यक्ष उतरवला जाणार आहे.

हा उपक्रम म्हणजे फक्त आरोग्याचा संदेश नाही, तर लोकमान्य टिळकांच्या स्वप्नालाही साकार करणारा प्रयत्न आहे. गणेशोत्सव हे केवळ उत्सव न राहता समाज बदलाचा श्वास घेऊ शकतो, हे या मोहिमेमुळे प्रत्येकाला जाणवणार आहे.

कोल्हापुरच्या परंपरेला साजेसा असा सामाजिक उपक्रम घेऊन येतोय ‘श्री गणेशा आरोग्याचा 2025’. कारण खरी श्रीमंती ही सोने-नाणी नसून सुखी, आरोगी जीवन आहे.


पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.