पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
धुळ्याच्या तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या अहमदनगरला बदलीचे आदेश!
धुळे(गोपाल के.मारवाड़ी) : येथील शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, आझादनगरचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आणि देवपूरचे पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर या तीन अधिकाऱ्यांची अहमदनगरला बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी 13 जानेवारी रोजी तिघांचे बदलीचे आदेश दिले.मध्यरात्रीनंतर त्यांना कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी.शेखर पाटील यांच्या आदेशान्वये लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
Loading ...
बदलीच्या आदेशानुसार संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी धुळे जिल्ह्यातील त्यांच्या वापरात असलेले शासकीय शस्त्र, दारुगोळा, ओळखपत्र, शासकीय निवासस्थानाचे स्थगित वीज बिल आदि भरणा करून पोलीस मुख्यालय धुळे येथे जमा करावे. तसेच आपल्याकडील पोलीस ठाण्याचा कार्यभार इतर पोलीस अधिकाऱ्यांकडे प्रशासकीय कागदपत्रांसह सोपवावा, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.त्यानुसार आझादनगर पोलीस ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार याच पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांना देण्यात आला आहे. तर धुळे शहर पोलीस स्टेशनचा अतिरिक्त कार्यभार सहाय्यक पोलीस निरीक्षक शकील रशीद शेख यांना सोपविण्यात आला आहे. देवपूर पोलीस ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र पाटील यांना दिला आहे.तीनही पोलीस ठाण्यांचा अतिरिक्त कार्यभार याप्रमाणे नवीन नियुक्ति होईपर्यंत या तिन्ही अधिका-यांना सांभाळावा लागणार आहे.
नम्र आवाहन:या _सामाजिक उपक्रम, तसेच गावच्या विकासासाठी दानशूर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते व CSR देणाऱ्या कंपनीने सढळ हाताने पुढाकार घ्यावा._ही विनंती.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.